मुंबई(शांताराम गुडेकर )
विक्रोळी टागोर नगर परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात १० खाटांचे सुसज्ज आय. सी. यु विभाग नुकताच सूरू करण्यात आला आहे. सदर या आय.सी. यु विभागाचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक व स्थापत्य समिति अध्यक्ष (उपनगर)उपेंद्र सावंत यांचे हस्ते करण्यात आले. या ठिकानी ह्दय रोग, मलेरिया,डेंगू, उच्च रक्तदाब, मधुमेह हे रूग्ण व ईतर गंभीर रूग्ण यांना तातडीने औक्सिजन पुरवठा व वेंटिलेटर ची सूविधा उपलब्ध होणे करता या विशेष सुसज्जित विभागाची निर्मिती करण्यात आली. याचा लाभ गोर गरीब रूग्ण यांना नक्कीच होईल.खाजगी रूग्णालयात ह्या सूविधांचा दर लाखोंच्या घरात जातो त्यामुळे गरीब रूग्ण यांना राजावाडी घाटकोपर व लोकमान्य टिळक सायन हॉस्पिटल शिवाय पर्याय नाही.अशा आणीबाणी काळात रूग्ण दगावले आहेत म्हणुन हे डॉ. आंबेडकर रूग्णालयातील आय. सी. यु.विभाग याचे निर्माण महत्वपूर्ण आहे. कोविड-१९ या रूग्णांना ईथे ईलाज केला जाणार नाही असे नगरसेवक उपेंद्र सावंत व रूग्णालयाच्या प्रमूख वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मश्री अहिरे यांनी सांगितले.या उद्घाटन समारोह प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रसेन कदम, प्रधानपरिचारिका मांजरेकर,प्रमूख परिचारिका तांबे, प्रमूख आय.सी.यु. परिचारिका भार्गव यांची उपस्थिति होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा