आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २२ जून, २०२०

पेण मनसेच्या वतीने चीनने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध : चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा बॅनर जाळला ; स्वदेशी वस्तूच वापरण्याचे नागरिकांना केले आवाहन





पेण :दिपक लोके

   मागील आठवड्यात भारत चीन मध्ये झालेल्या चकामकीमध्ये आपल्या देशाचे 20 जवान शहीद  झाल्याने भारतीय नागरिकांमध्ये चीन विरोधात कमालीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण देशभरात विविध स्तरातून चीनचा निषेध केला जात असतानाच आज पेण मनसेच्या वतीने देखील चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा बॅनर जाळून चीनच्या विरोधात घोषणाबाजी करून बॅनर वरील फोटोला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चपलांचा मार दिला.तसेच यावेळी शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.

  यावेळी सहभागी झालेल्या काँग्रेसच्या नंदा म्हात्रे यांनी चीनला आपण कितीही व्यापार दिला,कितीही त्यांचा पाहुणचार केला तरी त्यांनी त्यांची जात दाखवलीच त्यामुळे चिनी वस्तू वापरू नका, आर्थिक फटका बसल्याशिवाय ते सुधारणार नाहीत असे त्या म्हणाल्या.

   तर मनसेचे जिल्हा सचिव रुपेश पाटील यांनी आपल्या स्वदेशी वस्तू वापरल्या तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. सीमेवर जे जवान आपल्या संरक्षणासाठी खंबीरपणे उभे आहेत या जवानांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांना आपण साथ देऊया असे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शहापूर तालुक्यातील नडगावं जिल्हा परिषद गटातून हर्षल शेलवले निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

शहापूर (प्रतिनिधी): शहापूर तालुक्यात सध्या सर्वत्र जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तालुक्यातील महत्त्वाचं जिल्हा...