रायगड - अरविंद गुरव
पेण तालुक्यातही कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. तालुक्यात काल एकाच दिवशी कोरोनाचे १२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पेणकरांची चिंता वाढली आहे.
पेण शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर कोरोना रुग्णांची वेगाने वाढत चाललेली संख्या ही चिंतेचा विषय बनली आहे. काल पेण तालुक्यात एकाच दिवशी १२ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. नव्याने नोंद झालेल्या या १२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये गडब येथील ४, बेणसे येथील १, वडगाव येथील २ आणि पेण शहरातील ५ रुग्णांचा समावेश असल्याची माहिती पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांनी दिली. पेण शहरातील नागरिक मात्र बिनधास्त शहरात सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पायदळी तुडवत शहरात गर्दी करीत आहेत.
पेण तालुक्यात आज अखेर ४४ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत २४ पॉझिटीव्ह रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा