आज संकटाच्या काळात माणसातच देव असतो याची जाणीव सर्वाना झाली,हे ही नसे थोडके.देव देवळात नसून अनेकवेळा तो आपल्याला वेगवेगळ्या रुपात भेटत असतो.माणसावर आपदा अली की तो निराश होतो,हताश होतो,सर्व दुःख माझ्या वाट्याला असे बोलू लागतो व आता सर्व संपले असे बोलू लागतो व त्यातच एखादा त्याच्या पाठीमागे उभा डॉक्टरसारखा,मित्रासारखा व इतर अनेक रुपात उभा राहतो व तो माणूसच असतो.तेव्हा संकटग्रस्त माणूस म्हणतो,अरे अगदी देवासारखा धावून आला.तेव्हा आपण निदान देव नाही तर देवाचा मित्र म्हणून या धरतीवर नक्कीच चांगले कार्य करू शकतो जे आज कोरोनात होताना आपण सर्वत्र पाहतोय व हेच कार्य अनेकजणांनी विविध अवतार घेऊन या भूमीवर केले आणि हेच शाश्वत आहे.
देव एक...रूप अनेक
तेव्हा या एकत्र मिळून माणुसकीचे कार्य करू या व ही धरती सुंदर बनवूया.
SERVE MEN...SERVE GOD
Peace not Pieces,Let's works for it
जय हिंद
-गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा