मुंबई -(अविनाश हजारे)
सध्या उन्हाळा सुरु झाल्यामुळे व लॉकडाऊन असल्यामुळे घरोघरी ए.सी.चा जास्त वापर होत आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरवर लोड वाढल्यामुळे मागील दिवसापासून काही भागांमध्ये विद्युत प्रवाह कमी दाबाने होत आहे. कोरोना सारख्या महामारीत तसेच वाढते तापमान व लॉकडाऊनमध्ये नागरिकांची गैरसोय होवू नये, तसेच घरातून काम करणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास समजून घेत भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्वरित योग्य कार्यवाही करण्यास सांगितले.
त्यांच्या सुचेनुसार महावितरणच्या पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांनी पनवेल ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज जगताप यांना काम सुरू करण्यास मार्गदर्शन केले. याठिकाणी, 203 लघुदाब ग्राहक असलेल्या 100 kv चे ट्रान्स्फॉर्मर बदलून 200 kv चे ट्रान्स्फॉर्मर एका दिवसात बसविण्यात आले.
यावेळी, खालापुर उपविभागाचे, उपकार्यकारी अभियंता श्री. विकास गायकवाड तसेच दिवसभर उन्हात थांबून चौक विभागाचे सहाय्यक अभियंता, श्री. स्वप्नील मगरे यांनी स्वतः लक्ष घालून ट्रान्स्फॉर्मर बसवून घेतला व वोल्टेज चेक करून गावाचा विजेचा प्रश्न सोडवला. यामध्ये, खालापूरच्या कर्मचारी वर्गानी विशेष मेहनत घेतली. तसेच, तुपगांव ग्रामंस्थांनी देखील मदत करून विजेचा प्रश्न सोडवल्या बद्दल सर्व तुपगांव ग्रामस्थाच्या वतीने ऊर्जा मंत्री डॉ.नितिन राऊत, रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती ताई तटकरे व विद्युत मंडळाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
हे केवळ महावितरणच्या कामाचे एक ताजे उदाहरण आहे.
त्यामुळे या लॉकडाऊन च्या काळामध्ये वैद्यकीय सुविधेबरोबरच महावितरणही कामात तत्परता दाखवत असून त्यांचे योगदान दूर्लक्षून चालणार नाही असे महावितरणच्या भांडुप परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा