आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १२ मे, २०२०

भांडुपमध्ये श्री आनंदेश्वर महादेव मंदिर समिती, (नियो.) आनंद नगर यांचे समाजकार्य सुरूच...


मुंबई -(अविनाश हजारे)

          राज्य सरकारने आपत्तीजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन लॉक डाउन-३ ची (४ मे ते १७ मे पर्यंत वाढविण्याची) घोषणा केली. आणि परत अनेक जणांवर उपासमारीचे संकट कोसळण्याची चिन्हे दिसू लागली. तेव्हा समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र गुप्ता, सचिव श्री प्रसाद पुं. सावंत (SEO), व उपाध्यक्ष सुमित तिवारी , आणि कार्यकर्ते संदीप चंद, तेजस राणे, सचिन बाईंग, विकास कनोजिया, गणेश गावडे ह्यांसोबत चर्चा करून पुन्हा एकदा समाज कार्यात उडी घेतली आणि गरजवंतांसाठी त्यांनी धान्याचे बळकट किट्स वाटण्याचे ठरवले पण त्यासाठी त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टींची उणीव व धान्याचा तुटवडा जाणवत असल्या कारणाने त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना भांडुप विधानसभा राजगड शाखा क्रमांक ११२ चे शाखाअध्यक्ष सुनिल स.नारकर यांना साद घातली आणि आपले विषय आणि स्वतःच्या चाळीतील व ईतर काही कुटुंबाची यादी देऊन सर्व बाबी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे कानावर टाकल्या आणि आपल्या मुळगावी अडकले असुन सुद्धा सुनिल स.नारकर यांनीही कोणत्याही क्षणाचा विचार न करता  त्यांना योग्य व सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच श्री आनंदेश्वराच्या कृपेने समितीचे हितचिंतक व मित्र श्री सुकेश शशिकांत बाईंग यांनी सुद्धा  कामानिमीत्त बोटीवर अडकलेल्या परिस्थितीत असताना सुद्धा समितीशी संपर्क साधून समाजसेवेसाठी मदतीचा हात पुढे केला आणि जिन्नस आपल्या कुटूंबियांच्या मदतीने समितीपर्यंत पोहचवले.
         अशाच समाजसेवकांच्या सहकार्याने  १०० कुटुंबाना ०४ ते ०७ मे २०२० रोजी बळकट किट्सचे वितरण केले आणि समितीने हे सर्व श्रेय त्यांच्या मागे उभ्या असलेल्या श्री आनंदेश्वर महादेव आणि कार्यकर्त्यांच्या कार्याला व निपक्षीय एकजुटीला दिला तसेच सदैव पाठीशी असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भांडुप विधानसभा राजगड शाखा क्रमांक ११२ चे शाखाअध्यक्ष सुनिल नारकर यांना दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या

दरवर्षी दिवाळी आणि इतर सणांनिमित्त आनंदाचा शिधा रेशन दुकानांवर शासनाकडून देण्यात येतो, पण यंदा तो देण्या...