आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२६

आवाज कोकणचा दिवाळी अंकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

प्रतिनिधी : पनवेल कोकणसह उर्वरित महाराष्ट्रातील बातम्या व घडामोडींना तत्काळ वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी नावाजलेले व अल्पावधीत जनतेच्या पसंतीस उतरलेले वृत्तपत्र आवाज कोकणाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन लोकनेते माजी खासदार दानशूर श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, खजिनदार श्री. शैलेश ठाकूर व सदस्य श्री. दिलीप गायकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
     समाजातील शोषित, वंचित व अन्यायग्रस्ताना न्याय मिळवून देण्यासाठीं संपादक श्री. वैभव पाटील हे नेहमी अग्रेसर असल्याने या वृत्तपत्राने अल्पावधीत आपले नाव मोठे केले आहे. या वेळी श्री. रामशेठ ठाकूर यांनी आपले विचार मांडताना आवाज कोकणचाच्या दिवाळी अंकाची प्रशंसा करतानाच संपादक श्री. वैभव पाटील यांच्या लेखणीचे कौतुक केले व पाठीवर शाबासकीची थाप दिली .

वैशाली शेलार यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी जय हिंद गौरव पुरस्कार २०२६ जाहीर

मुंबई(गुरुनाथ तिरपणकर) समाजसेविका, कवयित्री व मॉडेल मा. वैशाली सोपान शेलार समाजसेवा, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या, रेवती करिअर अकॅडमीच्या चेअरपर्सन / संस्थापक अध्यक्ष श्रीमती वैशाली शेलार* यांचा एकाच वर्षी दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरव होत आहे. महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
1. राष्ट्रशक्ती गौरव सन्मान २०२६- “जीवन गौरव” पुरस्कार*
आदिवासी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रशक्ती फिल्म प्रोडक्शन मुंबई यांच्यावतीने होणाऱ्या *“राष्ट्रशक्ती गौरव सन्मान सोहळा २०२६”* मध्ये त्यांना *“आदर्श समाजसेविका जीवन गौरव पुरस्कार”* 
*कोण आहेत श्रीमती वैशाली सोपान शेलार?*
श्रीमती वैशाली शेलार या रेवती करिअर अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आणि दर्जेदार शिक्षण देतात. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आरोग्य शिबीर, वात्सल्य वृद्ध आश्रमात नेहमी अन्नदान आणि समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने कार्य करतात.
       त्या *Mrs & Miss India २०२५ च्या विजेत्या* असून त्यांना भारत समाज रत्न गौरव पुरस्कार २०२५, राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार, राजमाता कर्तृत्व भूषण गौरव पुरस्कार २०२५, स्वराज्य प्रतिष्ठान मुंबई यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यांना सामाजिक क्षेत्रातील विशेष व उल्लेखनीय कार्याबद्दल *राष्ट्रपिता महात्मा गांधी जय हिंद गौरव पुरस्कार २०२६* जाहीर झाला आहे.
सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान व प्रियदर्शनी फाऊंडेशन (रजिस्टर्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जात आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा *रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५.३० वाजता जनता केंद्र सभागृह, तुळसीवाडी, ताडदेव, आरटीओ बाजूला, मुंबई सेंट्रल (पश्चिम), रेल्वे स्टेशन जवळ, मुंबई* या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
        या सोहळ्यास पुरस्कार स्वीकारण्यासाठी वैशाली सोपान शेलार यांनी आपल्या मित्र परिवारासह आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
समाजसेवेसोबतच कविता आणि मॉडेलिंग क्षेत्रातही आपला ठसा उमटवणाऱ्या वैशाली सोपान शेलार यांच्या या गौरवाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस आयोजकांनी मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

दिवाळीच्या दिवशी घेतला माणुसकीचा संकल्प ! अपंगत्वाशी झुंजणाऱ्या कुटुंबाला सामाजिक कार्यकर्त्या योगिता शिर्के यांचा मदतीचा हात

गडब (अवंतिका म्हात्रे)-  दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण मानला जातो. मात्र, समाजातील काही गरजू कुटुंबांच्या आयुष्यात...