मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना, पुस्तकाचे लेखक स्व. सदाशिव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. अॅडव्होकेट श्री. टी.के. मोहिले यांनी आपल्या भाषणात, नाटकाची कहाणी थोडक्यात सांगितली. खेळ सुखदुःखाचा या पुस्तकाला, सरस्वती क्लासेसचे मालक श्री. मार्तंड औघडे सर यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकात संस्थेचे अध्यक्ष श्री. शंकर जंगम यांनीही आपले भावनिक मनोगत व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे स्व. सदाशिव चव्हाण यांची कन्या सौ. तृप्ती कदम यांनीही आपल्या मनोगतात आपल्या वडिलांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
"खेळ सुखदुःखाचा" हे नाटक, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वा. साहित्य संघ मंदिर गिरगाव, मुंबई येथे होत असलेल्या, महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत सादर होणार आहे.मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानून, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा