आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६

"सागरी भूमिपुत्र महासंघ" स्थापना सोहळा संपन्न!

मुंबई (सतिश पाटील ): राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे आगरी, कोळी, कराडी, कुणबी, आदिवासी, भंडारी आणि बारा बलुतेदारांच्या ‘सागरी भूमिपुत्र महासंघ’ स्थापना सोहळा  अत्यंत उत्साहात व भव्य दिव्य वातावरणात पार पडला.  
     या सोहळ्यास परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज यांची आशीर्वाद रुपी विशेष उपस्थिती लाभली. तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब यांची होती; परंतु काही कारणास्तव त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य न झाल्याने त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आपली उपस्थिती दर्शवून सर्वांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.  
  या कार्यक्रमाला पद्मश्री लक्ष्मण माने साहेब (विशेष उपस्थिती) आणि पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा साहेब (विशेष सागरी रत्न पुरस्कार) हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.  
    सर्व भूमिपुत्रांच्या न्याय व हक्कासाठी आणि संघटित प्रगतीसाठी ही चळवळ नव्या दमाने पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आज आपण सर्वांनी मिळून केला आहे!उपस्थित राहिलेल्या सर्व भूमिपुत्रांचे, स्नेहीजनांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

भयपट शॉर्टफिल्म ‘शापित ग्रंथ’ प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई (प्रतिनिधी) : कोकण निसर्गसौंदर्य आणि जंगल यांचा वापर करून शूटिंग झालेला भयपट काल रात्री मुंबईत रिलीज झाला. ग्रामीण भागातील लोककथांचा व...