आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२६

महिला डॉक्टरांचा ‘नवदुर्गा सन्मानपत्र’ देऊन गौरव ;जनजागृती सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम; रुग्णसेवेतील समर्पणाचा केला सन्मान!!

बदलापूर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)  ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या उदात्त भावनेतून रुग्णांना आरोग्यसेवा देण्यासाठी अहोरात्र तत्पर असणाऱ्या महिला डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करत जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने ‘नवदुर्गा सन्मानपत्र’ प्रदान करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. नुकत्याच संपन्न झालेल्या नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून बदलापूर येथील आरोग्य आयुष्मान भारत दवाखान्यात हा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला.
              महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. केतकी गायकवाड, डॉ. प्रियांका राठोड, डॉ. प्रगती भेरे आणि डॉ. हर्षदा बिऱ्हाडे यांना आकर्षक भेटवस्तू, पेन, गुलाबपुष्प आणि ‘नवदुर्गा सन्मानपत्र’ प्रदान करून गौरविण्यात आले. जनजागृती सेवा संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार, समता साहित्य अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा राष्ट्रपती पदक सन्मानित दिलीप नारकर यांच्या हस्ते हा सन्मान समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. स्पर्श हॉस्पिटल, बदलापूर-कर्जत-पनवेल महामार्ग परिसरातील आरोग्य आयुष्मान भारत दवाखान्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
             यावेळी बोलताना दिलीप नारकर म्हणाले, “डॉक्टर हा केवळ एक व्यवसाय नसून तो माणुसकीची सेवा करण्याचा पवित्र धर्म आहे. रुग्णाच्या वेदना समजून घेणे, त्याला योग्य उपचार देणे आणि त्याच्या मनात जगण्याची नवी उमेद निर्माण करणे, ही डॉक्टरांच्या कार्याची खरी महती आहे. विशेषतः महिला डॉक्टर घर, कुटुंब आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आरोग्यसेवेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहेत. अनेकदा प्रतिकूल परिस्थितीतही त्या रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असतात. त्यांच्या ज्ञानाला करुणेची जोड आणि कर्तव्याला सेवाभावाची किनार लाभलेली असते. अशा सेवाव्रती डॉक्टरांचा सन्मान करणे म्हणजे समाजातील सेवाभावी वृत्तीचा गौरव करणे होय. नवरात्रोत्सवातील नवदुर्गांच्या प्रेरणेतून या महिला डॉक्टरांच्या कार्याचा गौरव होत आहे, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्यांच्या हातून अशीच निरंतर रुग्णसेवा घडत राहो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, यश व समाधान लाभो,” अशा शब्दांत त्यांनी डॉक्टरांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
     संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना जनजागृती सेवा संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. समाजातील विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे, हा संस्थेच्या उपक्रमांचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
            निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी डॉक्टरांचे योगदान अनमोल आहे. रुग्णांना केवळ औषधोपचारच नव्हे, तर मानसिक आधार आणि विश्वास देणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ‘नवदुर्गा सन्मानपत्र’ उपक्रम राबविण्यात आला. आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजाप्रती आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणाऱ्या महिला डॉक्टरांचा सन्मान हा त्यांच्या कार्याला नवी प्रेरणा देणारा ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

महिला डॉक्टरांचा ‘नवदुर्गा सन्मानपत्र’ देऊन गौरव ;जनजागृती सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम; रुग्णसेवेतील समर्पणाचा केला सन्मान!!

बदलापूर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)   ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या उदात्त भावनेतून रुग्णांना आरोग्यसेवा देण्यासाठी अहोरात्र तत्पर असणाऱ्या मह...