आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२६

'विसावा' ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहात साजरा केला ज्येष्ठ नागरिक दिन !

मुंबई : १ ऑक्टोबर हा दिवस सर्व जगभरात ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. विसावा नागरी ज्येष्ठ नागरिक संघ, गोरेगाव पूर्व यांनी ३ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या आनंदात व जल्लोशांत साजरा केला.
     गोरेगाव वॉर्ड ४१ चे नगरसेवक - सुहास वाडकर, वॉर्ड ४०चे नगरसेवक तुळशीराम शिंदे हे उपस्थिताना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित होते. विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष - शांताराम खामकर व दिवाकर निमकर, वृतपत्र लेखक - पत्रकार - बाळ पंडित उपस्थित होते. उपस्थित अतिथीचे, अध्यक्ष - हिंदुराव वाडते व चिटणीस - रमेश शेलार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
      लकी ड्रॉ मधील विजेत्या स्पर्धेकाना भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले. मनोरंजना साठी कराओके गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यास उत्सफुर्त पणे दाद दिली. काहींनी त्यांच्या गाण्याच्या तालावर नृत्य केले. 
    तीन तास चाललेल्या या सोहळ्याचे सूत्रसंचालन - मंगेश पाटनाईक यांनी उत्तम केले. पदाधिकारी - रमेश शेलार, रोहिदास बुद्धिवंत, सोनू वारंग, बबन बोले व शैलजा बोन्द्रे यांनी व्यवस्था चोख ठेवली होती.

# आदर्श वार्ताहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अंधेरी पूर्व येथील बस आगाराचा मनमानी कारभार!!

मुंबई प्रतिनिधी (विलास देवळेकर): आज कित्येक महिन्यांपासून अंधेरी ते श्री. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथे बस क्रमांक ३३७ हि ब...