मुंबई (पंकजकुमार पाटील)- लग्न सराईचे सुरु झाल्यावर घरोघरी पालक, नातेवाईक आपल्या मुलांसाठी सुयोग्य वधु वा वर शोधण्याच्या तयारीला लागलेले दिसतात. पालकांचा हा लग्नाचा ताण हलका करून त्यासाठी सहकार्य करायला मुंबईतील आगरी समाज विकास संघ दरवर्षी विविध ठिकाणी वधु वर मेळावे भरवून समाजकार्य करण्याचे काम करीत असतो .
हाच सामाजिक हेतू समोर ठेऊन १९७५ साली स्थापन झालेल्या आगरी समाज विकास संघ, मुंबई यांच्या वतीने भव्य आगरी वधु -वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा रविवार दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता
बालाजी बॅन्क्वेट हॉल, सेक्टर-१०, प्लॉट नं.१९ए, बालाजी मंदीर, मीनी सी शोर जवळ, वाशी, नवी मुंबई याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे .
तेव्हा या मेळाव्यासाठी आगरी समाजातील इच्छुक वधु - वर उमेदवारांनी पालकांच्या सोबत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. धनाजी म्हात्रे 9869007754 श्री. सागर पाटील 9773529747 श्री. संजय म्हात्रे 9967972206 | श्री. श्याम नाकटे 9969620057.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा