आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२६

कोकण सुपुत्र सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मान.श्री.मनीष दळवी" महात्मा गांधी नोबेल नॅशनल अवॉर्ड -२०२६" ने सन्मानित

मुंबई (शांताराम गुडेकर ):  नवी दिल्ली येथे महात्मा गांधी जयंती निमित्त कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे ग्लोबल पीस कॉन्सिल, इंटरनॅशनल ह्यूमन राईट्सतर्फे कोकण सुपुत्र,सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मान.श्री.मनीष दळवी यांना आचार्य लोकेशजी मुनी,अविनाश संकुडे यांच्या शुभहस्ते महात्मा गांधी जयंतीनिमित्त " महात्मा गांधी नोबेल नॅशनल अवॉर्ड -२०२६"(Mahatma Gandhi Nobel National Award ) प्रदान करण्यात आला.
        मान.श्री.मनीष दळवी साहेब यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आल्याबद्दल बँक पदाधिकारी,कर्मचारी,साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, पत्रकार, वृत्तपत्र लेखक,ग्रामीण मंडळ, विविध संस्था,प्रतिष्ठान पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मानवी तस्करीविरोधी लढ्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना प्रशिक्षण : कुर्ल्यात एकदिवसीय कार्यशाळा; ३५ प्रशिक्षणार्थींचा सहभाग, तस्करीविरोधी सामूहिक प्रतिज्ञा

मुंबई  (विकास लहाने): मानवी तस्करीसारख्या गंभीर सामाजिक समस्येला प्रतिबंध करण्याबरोबरच तस्करीच्या घटनांमध्ये पीडितांना तातडीची मदत, कायदेशीर...