आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६

लेवा पाटीदार समाज अंबरनाथचा यशस्वी उपक्रम

अंबरनाथ( सुनील इंगळे) :नुकतेच भव्य दिव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधे वाटप शिबिर,लेवा पाटील समाज मंडळ-अंबरनाथआयोजित,रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ व इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथ हिल्स यांच्या सहकार्याने अंबरनाथ शहरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
     या आरोग्य शिबिरात अंबरनाथ शहरातील जवळपास 500 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली व त्यापैकी 405 नागरिकांनी तज्ञ डॉक्टरांमार्फत विविध प्रकारच्या तपासण्या केल्या व तपासणीनंतर त्यांना मोफत औषधेही देण्यात आली.अंबरनाथ व उल्हासनगर येथील 32 तज्ञ व स्पेशॅलिस्ट डॉक्टर्स यांनी या शिबिरामध्ये तपासणीसाठी सहकार्य केले त्याचबरोबर फार्मासिस्टची टीमही मोफत औषधे पुरवण्यासाठी तत्पर होती.
      या मेडिकल शिबिरामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या करण्यासाठी हॉलमध्ये विविध विभागांची वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आली होती.या भव्य मेडिकल कॅम्पचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे अध्यक्ष श्री.जयंत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यातआले.त्याचप्रमाणे दीपप्रज्वलन लेवा पाटील समाज मंडळाचे संस्थापक श्री.सोपान इंगळे सर, विश्वस्त श्री.वसंत होले सर,अध्यक्ष श्री.गुणवंत भंगाळे सर, कार्याध्यक्ष श्री.विठ्ठल खर्चे यांचे हस्ते करण्यात आले.या शिबिरात ज्या डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा दिली त्या सर्वांचा लेवा पाटील समाज मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच या शिबिरासाठी उपस्थित राहिलेल्या अंबरनाथ मधील व अंबरनाथच्या बाहेरील 80 ते 90 मान्यवरांचाही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
या शिबिरात अंबरनाथ शहराच्या नगराध्यक्ष सौ.तेजश्री ताई करंजुले उपस्थित राहिल्या त्यांनी उपस्थितांना शिबिराचे नियोजन किती चांगल्या प्रकारे केलेले आहे हे सांगून त्यांनीआयोजकांच्या नियोजनाचे व शिबिरासाठी आलेल्या पेशंटच्या उपस्थितीचे व शिस्तीचे कौतुक केले.
मेडिकल शिबिराच्या नियोजनासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या व त्या प्रत्येक समितीतील स्वयंसेवकांनी आपल्याला दिलेले काम अतिशय चोखपणे केल्यामुळे कार्यक्रम नियोजनबद्ध व यशस्वीपणे पार पडला. 
       शिबिराच्या संपूर्ण निवेदनाचे काम लेवा पाटील समाज मंडळाचे संस्थापक श्री.सोपान इंगळे सर व श्री मयुरेश कोल्हे यांनी सांभाळले.
शिबिरामध्ये सर्व कार्यकर्ते, आयोजक,पेशंट ,डॉक्टर्स , फार्मासिस्ट व निमंत्रित अतिशय उत्साहाने व आनंदाने आपापले कार्य करतांना जाणवत होते.मंडळाचे अध्यक्ष श्री.गुणवंत भंगाळे सर यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

भयपट शॉर्टफिल्म ‘शापित ग्रंथ’ प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई (प्रतिनिधी) : कोकण निसर्गसौंदर्य आणि जंगल यांचा वापर करून शूटिंग झालेला भयपट काल रात्री मुंबईत रिलीज झाला. ग्रामीण भागातील लोककथांचा व...