आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

पेणचे कल्पेश ठाकूर हे 'जीवनदूत ' पुरस्काराने सन्मानित ;रायगड पोलिसांकडून जीवनदूतांच्या कार्याचा गौरव

गडब (अवंतिका म्हात्रे): मुंबई गोवा महामार्गावर कुठेही अपघात झाला तर शासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वी पेणचे देवदूत कल्पेश ठाकूर तेथे पोहोचतात. आपला स्वतःचा व सहकाऱ्यांचा जीव धोक्यात घालून जखमींना बाहेर काढतात. वेळेत रुग्णालयात पोहचवतात. त्यामुळे जखमींना जीवनदान मिळतो. हेच खरे देवदूत आहेत. त्यांचे कौतूक दरवर्षी केलेच पाहिजे. हे लोक निःस्वार्थी पणे काम करत असतात. त्यांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार, असे आश्‍वासन रायगडचे पालकमंत्री तथा रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी साई सहारा प्रतिष्ठान पेणचे संस्थापक कल्पेश शरद ठाकूर, हेल्प फाउंडेशन खोपोली, शेलार मामा रेस्क्यू टीम माणगाव व जिल्ह्यातील अन्य मदतगारांना जीवनदूत पुरस्कार देऊन सन्मानित करताना दिले.
    रायगड पोलीस दलातर्फे रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत जीवनदूत सन्मान सोहळा आर.सी.इफ.सभागृह, कुरूळ येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री तथा रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, अलिबाग उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे, रिलायन्स फाउंडेशनचे शशांक गोयल, रमेश धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते. जीनवदूत म्हणून काम करणार्‍या जिल्ह्यातील अनेक संस्था व व्यक्तींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
   पालकमंत्री भरत गोगावले यांनी बोलताना सांगितले की, अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या रेस्क्यू संस्थांना सर्व वस्तूंची मदत करणार. अपघात कमी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुंबई - गोवा महामार्ग पूर्णत्वाकडे वाटचाल करत असल्याने मोठ्याप्रमाणावर होणारे अपघात संख्या कमी होताना दिसत आहे. बाकी रस्त्यांवरील आपघाताचे प्रमाण सुद्धा घटेल. मुंबई - गोवा रस्ता 100% पूर्ण होईपर्यंत अपघाताची सर्व जबाबदारी सरकारची आहे असे पालकमंत्री भरत गोगावले म्हणाले. जिल्ह्यातील सर्व कंपन्यांनी पुढाकार घेऊन अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या संस्थांना अधिकाधिक सहकार्य करावे. युवकांनी हेल्मेट घालावे. दारू पिऊन गाडी चालवू नका असेही आवाहन गोगावले यांनी केले.
    तर जीवनदूतांचा सत्कार स्तुत्य उपक्रम आहे. रायगड जिल्हा आगळावेगळा जिल्हा, अनेक प्रकारच्या आपत्ती नेहमी येत असतात. मात्र अनेक संकटांना सामोरे जाणारा रायगड जिल्हा. जीवनदूत हे खरे देवदूत आहेत. त्यांचा सन्मान केलाच पाहिजे. त्यांच्या कामाची दखल घेतलीच पाहिजे, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले. अपघातग्रस्तांना मतद करणार्‍यांवर कोणतीही कारवाई करायची नाही असे सर्वोच्च न्यायालाने सांगितले आहे. ते लोकांपर्यन्त पाहचेल पाहिजे, असेही जिल्हाधिकारी जावळे म्हणाले.
    जनजागृती झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. अपघातात मृत्यूपाणार्‍यांची संख्या देखील कमी झाली आहे. असे असले तरी अपघात होता. नैसर्गिक आपत्ती येते. त्यावेळी जीवनदूत आपला जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवतात. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे पोलीस अधिकक्षक आंचल दलाल यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. तर अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे यांनी आभार प्रदर्शन केले.
( कल्पेश ठाकूर हे मुंबई - गोवा महामार्गावर मागील वीस वर्षांपासून अपघातग्रस्त नागरिकांना विनामूल्य मदत करत आहेत. आता पर्यंत शेकडो अपघातग्रस्त नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. अपघात ग्रस्त नागरिकांना उपचारासाठी पेण, अलिबाग, पनवेल, मुंबई येथे स्व खर्चाने दाखल करुन समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना विविध शासकीय व सामाजिक पुरस्कार देऊन याआधी देखील गौरविण्यात आले आहे. आज रायगड पोलीस दला तर्फे जीवनदूत पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यात आले आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आगरी कवितांचे बादशाह पुंडलीक म्हात्रे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

नवी मुंबई : शिवतुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई संचलित, संवाद नात्यांचा ‘कविता डॉट कॉम' या साहित्य संस्थेचा ४था वर्धापन दिवस, कविता डॉट कॉमचा...