मुंबई प्रतिनिधी (विलास देवळेकर) : रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता दादर येथे डॉ. गायकवाड इन्स्टिट्यूट प्लाझा समोर सभागृहात "कोकण दीप आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन" च्या संयुक्त विद्यमाने ६ वे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.
काव्य मंचावर सुधीरभाऊ कदम (अध्यक्ष- युवा फाऊंडेशन), दत्ता खंदारे (सा. भगवे वादळ- संपादक), रामचंद्र नागरगोजे (सहाय्यक पोलीस आयुक्त- मुंबई), भाई नार्वेकर (जेष्ठ कवी), डॉ हेमंतराजे गायकवाड (डॉ गायकवाड इन्स्टिट्यूट- संचालक), नितीन सुखदरे (शोध आनंदाचा फाऊंडेशन- अध्यक्ष), विद्याधर शेडगे (कोकण दीप- उपसंपादक)आणि सोनल महाडिक (संपादिका- सा. जागरुक वसई) मान्यवरांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
सर्व उपस्थित मान्यवरांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शब्दश्री विलास देवळेकर यांनी आपल्या म्युझिकल इक्को साऊंड सिस्टीम मध्ये कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गाऱ्हाणा घातला. आणि लोकशाहीर दत्तात्रय म्हात्रे यांच्या स्वातंत्र्य पोवाडाने कवी संमेलनाला सुरुवात झाली. "निमंत्रित २० कवींनी" वेगवेगळ्या प्रकारे कविता- गीत सादर केल्या. काव्य मंचावर जणू काही "एकापेक्षा एक लहान मोठे काव्य पुष्प" सादर होत होते. त्यास उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांच्या गजरात 'प्रतिसाद' दिला. प्रत्येक कवींना मानाचे सन्मानपत्र- पुष्पगुच्छ देऊन 'गौरविण्यात' आले. मान्यवरांनी थोडक्यात 'मार्गदर्शन' केले. शेवटी सर्व उपस्थितांना 'अल्पोपहार' देण्यात आले.कार्यक्रमादरम्यान संपादक शेडगे यांचा केक कापून ४९वा वाढदिवस साजरा करण्यात आला. कवी नार्वेकर यांनी वाढदिवसाचे गीत सादर केले. शेवटी सर्व उपस्थितांना 'अल्पोपहार केक सहीत' वाटप करण्यात आले. अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात शिस्तबद्ध पण 'आनंदी व प्रसन्न' वातावरणात पार पडले. आणि ह्या कार्यक्रमाचे आपल्या ओघळत्या शैलीत उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रसाद महाडिक (कवी) यांनी करून सर्वांचे मन जिंकले. जाताना, सर्व कवींनी "कौतुक व समाधान" व्यक्त करत, नितीन सुखदरे यांचे 'अभिनंदन' करत, तसेच संपादक दिलीप शेडगे यांना 'शुभेच्छाही' दिल्यात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा