मुंबई (प्रतिनिधी):संत साहित्यावर आधारित लोकप्रिय एकपात्री नाटक "आनंदयात्रा" चा ८००वा भाग्यशाली प्रयोग शुक्रवार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता दादर येथील मांटुगा कल्चर सेंटर, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
 |
| डॉ.राजीव श्रीखंडे, मान.प्रसाद कुलकर्णी, सन्मा.शशिकांत सावंत, |
या विशेष प्रयोगप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये उद्योगपती, लेखक आणि जागतिक साहित्याचे अभ्यासक डॉ. राजीव श्रीखंडे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, महाराष्ट्र राज्याचे माजी प्रधान सचिव चिंतामणी संगीत राव,कवी गीतकार पत्रकार आणि आनंद यात्रा प्रयोगाचे सर्वेसर्वा प्रसाद कुलकर्णी, समाजसेवक पत्रकार श्री.शशिकांत सावंत ,माजी शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. जिवबा केळकर, कवयित्री सौ. जयश्री संगीत राव, कवयित्री आणि लेखिका सौ. सोनाली जगताप, समाजसेवक डॉ. रेवती आळवे उपस्थित होते.
 |
सन्मा.चिंतामणी संगीतराव,मा.डॉ.प्रा.केळुसकर जिवबा, मा.जयश्री संगीतराव,मान.शशिकांत सावंत आणि मा. सौ.सोनाली जगताप
|
"आनंदयात्रा" या एकपात्री प्रयोगाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून ८०० प्रयोगांचा टप्पा पार करून या नाटकाने एक नवा विक्रम केला आहे. संत विचारांचा प्रसार आणि मराठी साहित्य-संस्कृतीच्या जतनासाठी हा प्रयोग महत्त्वाचा ठरला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा