आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २३ ऑगस्ट, २०२६

वासिंद, आसनगाव व कसारा ग्रामपंचायतींना नगरपरिषदेची मान्यता मिळावी- निलेशजी सांबरे यांची मागणी

वासिंद ( हर्षल शेलवले )-शहापूर तालुक्यातील वासिंद, आसनगाव आणि कसारा या वाढत्या लोकसंख्येच्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींना नगरपरिषदेचा दर्जा मिळावा, अशी मागणी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेशजी भगवान सांबरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
     या तिन्ही परिसरांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून लोकसंख्या, बांधकामे, व्यापार-व्यवसाय आणि नागरी सुविधांची गरज सातत्याने वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सुविधांवर मर्यादा येत असून, भविष्यातील विकासाचा विचार करता नगरपरिषद स्थापन करणे आवश्यक असल्याचे सांबरे यांनी म्हटले आहे.
      नगरपरिषद झाल्यास रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पथदिवे, आरोग्य सुविधा तसेच इतर नागरी सोयी-सुविधांचा नियोजनबद्ध विकास होण्यास मदत होईल. तसेच वाढत्या शहरीकरणाला योग्य दिशा मिळून परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.
      त्यामुळे शासनाने वासिंद, आसनगाव आणि कसारा ग्रामपंचायतींना नगरपरिषदेचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निलेशजी भगवान सांबरे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

स्ट. जॉन द बॅप्टिस्ट हायस्कूल, ठाणेने स्वाभिमान भारत कप २०२६ मध्ये मिळवले दिमाखदार यश

ठाणे(शांताराम गुडेकर )-  स्ट.जॉन द बॅप्टिस्ट हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, ठाणेने प्रियांदर्शी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुलुंड, मुंबई येथे आयोज...