आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६

कास्ट्राईब सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या शहापूर तालुका अध्यक्षपदी आयु.जगदीश गायकवाड सर यांची नियुक्ती

वासिंद (हर्षल  शेलवले): कास्ट्राईब सेवानिवृत्त शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील पाच शिक्षक कर्मचाऱ्यांची तालुकानिहाय अध्यक्ष पदाकरीता निवड करण्यात आली आहे.व त्यांना त्याप्रमाणे आदेश देण्याचे सभेसमोर अध्यक्षांनी जाहीर केले आहे. या अनुषंगाने त्यांनी तालुकास्तरीय कार्यकारणी तयार करावी.
याप्रसंगी संघटनेच्या शहापूर तालुका अध्यक्षपदी आयु.जगदीश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शांत,संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्वाची तालुकाअध्यक्ष पदी निवड झाल्याने संघटनेला बळकटी मिळाली आहे.
     यामुळे शैक्षणिक,सामाजिक व राजकीय स्तरावरून गायकवाड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

" कुंकुमार्चन " सोहळ्याचे आयोजन

मुंबई : मराठमोळं मुलुंड ही संस्था सातत्याने मुलुंडमधील मराठी परंपरा व संस्कृती जपण्याचे कार्य करत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन रविवार दिनांक २...