मुंबई (सतिश पाटील ): नाट्यलंकार प्रस्तुत 'स्वामींची शाळा' या गाजत असलेल्या बालनाट्याच्या संपूर्ण टीमचा श्री स्वामी समर्थ मठ, दिंडोरी प्रणीत (गणेश तलाव, म्हाडा, मुलुंड पूर्व) येथे विशेष सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे, 'स्वामींची शाळा' या बालनाट्याचा शुभारंभ याच पवित्र मठातून झाला होता. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा कलाप्रवास आज अनेक बालकलाकारांना अभिनयाची संधी, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन देत आहे.मुलुंड येथील नाट्यलंकार संस्थेमार्फत सातत्याने बालकलाकार घडविण्याचे कार्य सुरू असून, कला आणि अध्यात्माचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळत आहे. या प्रसंगी मठाच्या वतीने संपूर्ण टीमचा सन्मान करण्यात आला. याबद्दल नाट्यलंकार परिवाराने श्री स्वामी समर्थ मठाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा