आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १७ जून, २०२६

विरेंद्र म्हात्रे यांना मुंबईत पुरस्कार प्रदान

नवी मुंबई : राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार २०२६ समाजसेवा, पर्यावरण, संवर्धन, धार्मिक उपक्रम आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणारे नवी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत 'राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार२०२६' प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या वतीने मुंबई येथे आयोजित दर्पण गौरव संमेलनात हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
     मुंबईतील मराठी पत्रकार भवन येथे झालेल्या या सोहळ्यात प्रसिद्ध कोळी नटसम्राट राजेश खर्डे वेसावकर यांच्या हस्ते लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आयकर विभागाचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त सुनील अगवणे, संगीतकार कौशल इनामदार, डॉ. अमजद खान पठाण, डॉ. पूर्णिमा सुर्वे, डॉ. जे. के. महाडिक, उत्तम तरकसे, सायली पावसकर, सलमा खान, एन. डी. खान आदी उपस्थित होते.
     लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे विरेंद्र यशवंत म्हात्रे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि पर्यावरण क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी समाजसेवेची वाट निवडली असून, कोणतेही शासकीय अनुदान किंवा वर्गणी न घेता स्वतःच्या खर्चातून विविध उपक्रम राबवत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मुंबई येथे " राष्ट्रीय कार्य दर्पण गौरव संमेलन संमेलन संपन्न"

मुंबई : "पुरस्कारा मुळे व्यक्तीच्या चांगल्या कामाची दखल घेतली जाते.त्यामुळे त्या व्यक्तीची ऊर्जा शतपटीने वाढते.भावी काळात आपल्या उत्तम ...