आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ६ जून, २०२६

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरीक सेवा संस्थेचे पुरस्कार जाहीर !

मुंबई (प्रतिनिधी): राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र व जागृत नागरीक सेवा, महाराष्ट्र यांच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून, समाजातील सर्व घटकांच्या उन्नती व प्रगतीकरीता सातत्याने समाजाभिमुख कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना, रविवार दि. २८ जून रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे, राज्यातील महनीय व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
जे कार्यकर्ते आपणही समाजाचे कांहीतरी देणे लागतो या भावनेतून, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला क्रिडा, अध्यात्म, आरोग्य, पत्रकारीता, उद्योग, कृषी, योगा, शासकिय व निम शासकीय सेवेत वैशिष्ठयपूर्ण कार्य तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी सेवाभावीवृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करतात. अशा कार्यकर्त्यांना समाज भूषण, समाज रत्न, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक/शिक्षिका, कामगार भूषण, कामगार रत्न, सहकार भूषण, कला भूषण, कृषी रत्न, साहित्य भूषण, उद्योग भूषण, उद्योग रत्न, आदर्श योग शिक्षक/शिक्षिका, आदर्श माता आदि. पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
*राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेले पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे -*
डॉ. प्रभाकर कांबळे - कोल्हापूर रत्न, केरबा डावरे - शाहू पुरस्कार, राजेंद्र जाधव समाज रत्न
कल्पना भाईगडे - आदर्श माता, संजीव चिकुर्डेकर - शाहू पुरस्कार, काळूराम लांडगे - शाहू पुरस्कार, भरत सकपाळ - समाजरत्न, विठ्ठल नाईक - समाज भूषण, बालाजी सक्करगे - कामगार भूषण, विजय रणखांब - जीवन गौरव, राजकुमार किर्दत - कामगार भूषण, विनय पिंपरकर - साहित्यरत्न, रविंद्र पाटील - कामगार भूषण, किरण नामजोशी - आध्यात्मिक कला भूषण, दत्तात्रय दिवेकर - कृषी भूषण, पांडुरंग उर्फ सर्जेराव पाटील ठाणेकर - शाहू पुरस्कार, विलास निकम - योगरत्न जीवनगौरव पुरस्कार, दत्तात्रय जाधव - कामगार भूषण, उदय रोटे - आदर्श कामगार, एकनाथ कंदले - शाहू पुरस्कार, मनोज पवार - कृषी भूषण, अभिजीत बिडकर - उद्योग रत्न, संतोष नातू - कृषी भूषण, लीलावती पाटील - समाजरत्न, राम सारंग - समाजभूषण, संतोष शिंदे - समाजभूषण, चंद्रकांत लव्हटे - उद्योगरत्न, अनंतराव घोगरे पाटील - शाहू पुरस्कार, पोपट देसाई - समाज रत्न, हिरालाल चौधरी - समाज भूषण, प्रदीप हसबे - आदर्श शिक्षक, पांडुरंग पाटील - आदर्श शिक्षक, अरुण सूरकर - समाजभूषण, अशोक मासाळे - समाजरत्न, गीता पवार - समाजभूषण, शामराव बोडके - उद्योग भूषण, राजेंद्रकुमार पाटील - समाजरत्न 
*राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेले पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे -*
किशोर बिंद .. सहकार भूषण , विद्याधर राणे-- कामगार भूषण , दीपक शिंगरे --सहकार रत्न,
 प्रशांतकुमार शेरवेगार-सहकार भूषण , राजू सोनकांबळे --सहकार भूषण , बाळकृष्ण तावडे --सहकार भूषण ,रेवती जरग - समाजरत्न, भार्गवी कुलकर्णी - प्राणी मित्र, राहुल पाटील - कामगार रत्न, लता दुधाळे - कामगार रत्न, प्रज्ञा शिंदे - आदर्श परिचारिका, प्रदीप जाधव - कामगार भूषण, सुनील कुचेकर - शाहू पुरस्कार, शिवाजी दिंडे - समाजभूषण, गणेश भोसले - समाजभूषण, रमेश नाईक - महाराष्ट्र रत्न, संगीता चव्हाण - आदर्श समाजसेविका, शिवानी हिंगोणीकर - समाजभूषण, स्वाती दिवाण - आदर्श माता, नरहरी माळी - समाजभूषण, राहुल राजापुरे - साहित्य भूषण, मेघा शिवगुंडे - आदर्श महावितरण अभियंता, विलास पाटील - अध्यात्मिक कला भूषण, हर्षल बनसोड - शाहू पुरस्कार, पंडित निंबाळकर - समाजभूषण, चंद्रकांत पाटील - क्रीडारत्न, मनीषा सुतार - आदर्श शिक्षिका, तुळसीदास सन्नके - कोल्हापूर भूषण, रेहाना मुल्ला - समाजरत्न, वसंत पाटील - कामगार व कवी भूषण, वैशाली कांबळे - कामगार भूषण, उत्तम जगताप - आदर्श पत्रकार, आकाश शिंदे - कृषी भूषण
सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकत्यांनी व मान्यवरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
         यावेळी प्रभाकर कांबळे, (मुंबई) अनिता काळे, रूपाली निकम, संजय सासने, संभाजी थोरात, भगवान माने, शिवाजी चौगुले, किशोर तळेले, महादेव चक्के, विजय रणखांब, शैलेंद्रनाथ इंगळे, रघुनाथ मुधाळे, दिनकर आडसूळ, केरबा डावरे, भरत सकपाळ आदी. पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरीक सेवा संस्थेचे पुरस्कार जाहीर !

मुंबई (प्रतिनिधी): राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र व जागृत नागरीक सेवा, महाराष्ट्र यांच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच राजर्षी छत्रपती...