आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ५ जून, २०२६

"सिद्धांत रायफल व पिस्तूल शूटिंग क्लब रायगड" चे नेमबाज करणार रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व...

गडब ( अवंतिका म्हात्रे) दिनांक 4 जुन ते 9 जुन 2026 दरम्यान होणा-या 29 व्या कॅप्टन एस.जे.एझिकल शूटिंग नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत क्लब चे नेमबाज प्रितम पाटील, महेश फुलोरे,संदेश थळे , अब्दुल रहिम शेख,डॉ.विलास मानकर,गौरव केसर,सदानंद म्हालेटकर, करण बेहरे,सचिन कुमार, माणस कणवाजे,मिलिंद पांचाळ, पार्थ तोडकर, सिद्धेश पोवळे,दिग्विजय चौगुले, पाशान मानकेशा,सुमेध गावडे,मनिष गुप्ता,अस्मिता झा,खुशी गुप्ता,वरा देवळेकर ह्या सर्व नेमबाजांची महाराष्ट्र रायफल संघटना वरळी मुंबई येथे स्पर्धेकरीती महाराष्ट्र रायफल संघंटना मान्यताप्राप्त सिद्धांत रायफल व पिस्तूल शूटिंग क्लब रायगड चे नेमबाज जिल्ह्याचे प्रतिनिधित्व पिस्तूल व रायफल ह्या खेळ प्रकारामध्ये करणार आहेत,ह्या स्पर्धेत निवड झालेले नेमबाज ऑल इंडिया स्पर्धे करिता महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतील, ह्यासाठी त्यांनी क्लब चे सेक्रेटरी ,प्रशिक्षक,रायगड भुषण,विख्यात राष्ट्रीय नेमबाज किशन खारके,तसेच राष्ट्रीय नेमबाज,आय,एस.एस एफ कौच अलंकार कोळी यांच्याकडे नेमबजीचे प्रशिक्षण ईंडियन माॅडेल स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज उलवा,चिरनेर अशा वेगवेगल्या रेंजवर घेतले आहे.प्रशिक्षकांच्या उत्तम कामगिरीमुळे इतर जिल्ह्यातील मुले प्रशिक्षण घेण्यासाठी सिद्धात रायफल व पिस्तूल शूटिंग क्लब रायगड रेंजवर येत असतात.रायगड,नवी मुंबई, ठाणे,अशा अनेक जिल्ह्य़ात शूटिंग रेंज उभारून नेमबाजीचा सर्व वयोगटातील मुले व मुलीना प्रशिक्षण देण्याचा क्लबचे 
सेक्रटरी किशन खारके ह्याचा मानस आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"सिद्धांत रायफल व पिस्तूल शूटिंग क्लब रायगड" चे नेमबाज करणार रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व...

गडब ( अवंतिका म्हात्रे) दिनांक 4 जुन ते 9 जुन 2026 दरम्यान होणा-या 29 व्या कॅप्टन एस.जे.एझिकल शूटिंग नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धे...