शनिवार, २५ एप्रिल, २०२६
टिटवाळा येथे प्रथमच राज्यस्तरीय कविसंमेलन धुमधडाक्यात संपन्न !!
प्रतिनिधी : मुंबई उपनगर टिटवाळा येथील रहिवासी १२वर्षे निस्वार्थ सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि अष्टपैलू कलाकार राजेंद्र मधुकर सावंत. यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चाने प्रथमच राज्यस्तरीय कविसंमेलन "हरी ओम व्हॅली सोसायटीत" आपल्या भारताचे युगपुरुष- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त "६४ कला मराठी भक्तिगीत कार्यक्रम" आयोजित "महामानवाला करु सलाम" ह्या शिर्षकाखाली कविसंमेलन आयोजित करण्यात आले. त्यास राज्यभरातून नागपूर, चाळीसगाव, पुणे, नाशिक, शहापूर, ठाणे, कल्याण, कोल्हापूर आणि मुंबई येथून आलेल्या कवी आणि कवयित्रींनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. सभागृह द्वार शेजारीच सावंत यांनी "महामानवाला करु सलाम" अशी सुंदर रांगोळी काढलेली दिसते. कवीप्रेमी असलेले मा श्री दिपक घाणेकर यांच्या हस्ते रिबीन कापून काव्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. सर्व उपस्थितांना पाणी व चहाची व्यवस्था करण्यात आली होती. काव्य मंचावर प्रमुख पाहुणे मा श्री दत्ताराम म्हात्रे (जेष्ठ लोकशाहीर), मा श्री मनमोहन रोगे (जेष्ठ मालवणी साहित्यिक व कवी), मा श्री विलास देवळेकर (समाजभूषण- साहित्यिक- कवी व गीतकार), संमेलनाध्यक्ष मा श्री डॉ ख र माळवे (जेष्ठ साहित्यिक- श्रामणेर बौद्धाचार्य- व राष्ट्रीय पुरस्कार्ते) संयोजक मा ऍड श्री रुपेश पवार (साहित्यिक- कवी- गीतकार व पत्रकार), राजगुरू राजरत्न (जेष्ठ कवी), कवीप्रेमी मा श्री दिपक घाणेकर (काव्य सोहळ्याचे उद्घाटक)आणि हरी ओम व्हॅली मदर सोसायटीचे अध्यक्ष मा श्री भरत खरे हे काव्य मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ माळवे, मालवणी साहित्यिक रोगे आणि लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर- छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्या नंतर प्रमुख पाहुण्यांची ओळख व शाल व गमजा गळ्यात घालून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संयोजक राजेंद्र सावंत यांनी प्रास्ताविक केले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची देवाणघेवाण काव्य मंचावर येथे प्रथमच आपण राबवित आहोत. ना देणगी आणि निःशुल्क हा कवी संमेलन, आपल्या सर्व कवी व कवयित्रींच्या सहकार्याने करीत आहोत. याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपुर्वक आभार व्यक्त केले. आणि अध्यक्ष डॉ माळवे यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी चे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त "विशेषांकाचे भगवे वादळ - कोकण दीप आणि व्हर्ल्ड व्हिजन टाइम्स" चे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर शब्दश्री विलास देवळेकर लिखित 'भीम वंदना' आणि खास साहित्यिकांसाठी 'डॉ बाबासाहेब काव्य प्रतिज्ञा' सादर केली. त्या नंतर शाहीर दत्ताराम म्हात्रे यांनी "भीम कविता व छ.शिवपोवाडा" सादर केला. आणि देवळेकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कविता सादर करुन, कविसंमेलनाला सुरुवात झाली. उपस्थित अनेक जेष्ठ कवी व नवोदित श्रेष्ठ कवींनी कविता सादर केली. त्या सर्व सहभागींना प्रत्येकाला एक विशेषांक भेट देण्यात आली. प्रमुख पाहुणे मालवणी साहित्यिक मनमोहन रोगे आणि संमेलनाचे अध्यक्ष डॉ माळवे यांनी ह्या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले. सहभागी ४३ कवींना सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.उपस्थित मदर सोसायटी कमिटीने, अनपेक्षित श्री व सौ सावंत दाम्पत्याचे शाल व गमजा गळ्यात घालून पुष्पगुच्छ देऊन 'सत्कार' केले. शेवटी लोकाग्रहास्तव सावंत यांनी "कराओके भीम गीत" सादर केले आणि कार्यक्रमाची सांगता देवळेकर लिखित 'राष्ट्र ध्वज' गीताने करण्यात आले. तसेच, सर्व उपस्थितांनी सहभोजनचा आस्वाद घेतला. आणि आयोजक व उत्कृष्ट सूत्रसंचालक राजेंद्र सावंत यांच्या शिस्तबद्ध कार्यक्रमाबद्दल सर्वींनी जाताना समाधानाने 'अभिनंदन आणि शुभेच्छा' दिल्या आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिटवाळा येथे प्रथमच राज्यस्तरीय कविसंमेलन धुमधडाक्यात संपन्न !!
प्रतिनिधी : मुंबई उपनगर टिटवाळा येथील रहिवासी १२वर्षे निस्वार्थ सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि अष्टपैलू कलाकार राजेंद्र मधुक...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा