आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ८ एप्रिल, २०२६

पवईतील तरुणांची महामानवास अनोखी मानवंदना

मुंबई (प्रतिनिधी ): दरवर्षीप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या १४ एप्रिल रोजी १३५ वी जयंती आहे.हा जयंती महोत्सव समाज माध्यमातून साजरी होत असतो. परंतु पवई आणि पवईतील तरुणांई नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे अभियान उपक्रम राबवून समाजहितासाठी झटत राहतात .त्यातीलच हा एक तरुण ज्यानं अनोख्या पद्धतीने महामानवास मानवंदना द्यायचे ठरविले आहे.
      कोरोना काळात सर्व काही ठप्प असताना पवईतील प्रतिक कांबळे याच तरुणाने मोबाइलचा वापर करत डिजिटल ग्राफिक्स डिझाईनचा व्यवसाय घरातून करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.तो व्यवसाय आजवर अविरत पणे आजही सुरू आहे त्याच त्यांच्या जय भीम डिजिटल ग्राफिक्स पवई तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार त्यांना एक अनोखी मानवंदना देण्याचे ठरविले आहे.
      जय भीम डिजिटल ग्राफिक्स या व्यवसायाच्या वतीने समाजातील आंबेडकरी अनुयायी यांना मोफत जयंतीचे डिजिटल ग्राफिक्स बनवून देत त्या ऐवजी एक वही व एक पेन अभियान या तरुणांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल सोशल मिडिया द्वारे राबविले जात आहे.समाजातील सर्वांनी यात सहभागी होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा यांना ग्रहण करत शिक्षणापासून वंचित असलेल्या लहानग्यांना शिक्षण देण्याचे काम करण्याचा ध्यास या तरूणाने घेतल्याचे दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पवईतील तरुणांची महामानवास अनोखी मानवंदना

मुंबई (प्रतिनिधी ): दरवर्षीप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या १४ एप्रिल रोजी १३५ वी जयंती आहे.हा ...