मुंबई: भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई संचलित 'अन्नपूर्णा स्वादिष्ट समूहातर्फे' आयोजित 'राज्यस्तरीय ऑनलाइन मोदक महा स्पर्धा २०२६' नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवत आपल्या पाककलेचे दर्शन घडवले.
आरोग्य आणि चवीचा अनोखा संगम
या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धकांनी सादर केलेल्या मोदकांच्या वैविध्यपूर्ण पाककृती. केवळ चवीलाच नव्हे, तर आरोग्याला हितकारक आणि दिसायला अत्यंत आकर्षक अशा मोदकांच्या रचनांनी परीक्षकांची मने जिंकली. पारंपरिक उकडीच्या मोदकांपासून ते आधुनिक पौष्टिक घटकांचा वापर केलेल्या नवनवीन प्रयोगांपर्यंत अनेक प्रकार या स्पर्धेत पाहायला मिळाले.
स्पर्धेचे निकाल आणि विजेते:
स्पर्धेतील चुरस पाहता अनेक क्रमांकांचे वाटप विभागून करण्यात आले. विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
प्रथम क्रमांक (विभागून): सौ. प्रणाली सत्यवान पाटिल (उलवे), सौ. अर्चना कुमार (चेंबूर), सौ. गीता श्रीकांत कुडाळकर (कामोठे, पनवेल), सौ. नूतन चंद्रशेखर वैद्य (दापोली). द्वितीय क्रमांक (विभागून): सौ. वंदना सुनील भुजोड (कोपरखैरणे), सौ. स्वाती नितीन कुलकर्णी (वाशी), सौ. शोभना कानस्कर (कोपरखैरणे), सौ. दर्पणा मंगेश जाधव (नालासोपारा), कु. सायली विलास जामसंडेकर (घाटकोपर). तृतीय क्रमांक (विभागून):सौ. वीणा अमोल भोसले (चिपळूण), सौ. सुप्रिया विनय वारगांवकर (बोरिवली), सौ. कल्पना किरण विसपुते (कांदिवली), सौ. वृषाली विश्वनाथ वारगांवकर (बोरिवली), सौ. ज्योती भास्कर दाते (अंबरनाथ).
विशेष उल्लेखनीय पाककृती: सौ. भावना खंडारे (कांदिवली), सौ. रत्नप्रभा सुधाकर सानप (सायन), सौ. सायली राणे (बोरिवली)
या सर्व विजेत्या स्पर्धकांना संस्थेतर्फे अधिकृत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, संस्थेच्या आगामी भव्य 'पदवीदान समारंभात' या सर्व सुगृहिणींचा विशेष सन्मान केला जाईल.या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे परीक्षक, स्पर्धा आयोजक आणि विशेष पाककृती अभ्यासकांचे मोलाचे सहकार्य लाभले. ऑनलाइन स्वरूपात असूनही या स्पर्धेने राज्यभरातील महिलांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा