हे रक्तदान शिबिर शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी १०.० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत कोष्टी समाज मंदिर, सावर्डे (वहाळफाटा) तालुका चिपळूण येथे पार पडणार आहे. या सामाजिक उपक्रमासाठी श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट डेरवण हॉस्पिटल यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.
समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदात्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी ,अल्पोपहार व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या उपक्रमात नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे. असे आवाहन श्री देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क:- अरविंद भंडारी (सचिव) 9356986419 / 9881520576
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा