नुकताच सिने-नाट्य सांस्कृतिक गुढी चा पहिलावहिला कलावंत मेळावा राशी स्टुडिओ, माने वखार, करीरोड, मुंबई 12. या ठिकाणी प्रसिद्ध सिने-नाट्य कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, निर्माते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हा मेळावा एकत्रितरीत्या साजरा करण्यामागे उद्देश एवढाच होता कीं तळागाळातील सर्व कलावंतांनी एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा शिवाय एकमेकांच्या भेटीगाठी होऊन कामासंदर्भात चर्चा होईल आणि प्रत्येक कलावंताला त्याच्या हाताला काम मिळेल. या मेळाव्याचे आयोजन सर्वश्री दिलीप दळवी, डॉ.किशोर खुशाले, अनिल सुतार, महेश्वर तेटांबे, शीतल माने-शेळके आणि सिद्धी कामथ यांनी केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन महाराष्ट्र बाजारपेठ चे संस्थापक,अध्यक्ष डॉ.कौतिक दांडगे, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सदानंद राणे, प्रसिद्ध हास्य अभिनेते कांचन पगारे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात अनेक कलावंतांनी सहभाग घेऊन आपली कला सादर केली त्यात प्रामुख्याने लावणी नृत्य, एकपात्री अभिनय, नाट्य प्रवेश, कराओके गायन आणि खास करून प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार यांनी स्व.शाहीर दादा कोंडके यांच्या गीतांवर केलेलं नृत्य आणि प्रसिद्ध वादक कलावंत डॉ.किशोर खुशाले यांनी काही निवडक वाद्यांची माहिती आपल्या कल्पकतेने मांडून रसिकांची वाहवा मिळवली. प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आपल्या मधाळ आणि रसाळ वाणीने करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. आणि महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी जमलेल्या सर्व कलावंत, अतिथी यांचे आभार मानले. हा पहिलावहिला कलावंत यशस्वी करण्यासाठी सिद्धी कामथ आणि शीतल माने-शेळके यांनी विशेष मेहनत घेतली. त्याचप्रमाणे या मेळाव्यासाठी सर्वश्री.अरविंद घेवडे, प्रमोद मोहिते, आबा पेडणेकर, शंकर पिसाळ, अविनाश राऊत, उदय साटम यांनी सर्वतोपरी सहकार्य केलं. अशा तऱ्हेने कलावंतांच्या उत्साहात पहिलावहिला कलावंत मेळावा जोशात आणि दिमाखात संपन्न झाला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
सिने-नाट्य सांस्कृतिक गुढी चा पहिलावहिला कलावंत मेळावा दिमाखात संपन्न..!
मुंबई, करीरोड (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) नुकताच सिने-नाट्य सांस्कृतिक गुढी चा पहिलावहिला कलावंत मेळावा राशी स्टुडिओ, माने वखार,...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा