आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १ एप्रिल, २०२६

आर.के.बी.एड.,डी.एड.लॉ कॉलेजच्याआर.के.युवा ‘ज्ञानप्रवाहाचे’ प्रकाशन

मुंबई :-भांडुप येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर.के.बी.एड व डी.एड, विधि महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र यांचे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन व कला क्रीडा महोत्सवाचा बक्षीस समारंभ विभागीय संचालक श्री वामन नाखले, ठाणे महानगरपालिका उपायुक्त महादेवराव जगताप, मनपा कर्मचारी बँकेचे संचालक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य श्री प्रदीप सावंत, सिनेट सदस्य शशिकांत झोरे, श्री मयूर पांचाळ, जेजेटीयू विद्यापीठाचे श्री नायकोडी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे मा.प्राचार्य श्री गायकवाड, संस्थेचे संचालक रमेश खानविलकर आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. 
संचालक रिद्धेश खानविलकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचे लेख असलेले विधी महाविद्यालयाचे “ R. K. JURI’S JOURNAL” व शिक्षणशास्त्राचे “ज्ञानप्रवाह” वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. 
       विभागीय संचालक श्री वामन नाखले यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक केले. श्री महादेव जगताप उपायुक्त व संचालक यांनी तरुणांनी स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांच्या परीक्षा देऊन प्रशासनात येणे आवश्यक असून रिद्धेश खानविलकर सारखे तरुण या महाराष्ट्रात तयार होणे आवश्यक आहे असे म्हणाले. 
मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत , सिनेट सदस्य शशिकांत झोरे, सिनेट सदस्य मयूर पांचाळ यांनी प्रशस्त इमारत, भव्य वाचनालय, विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सुविधा, प्राध्यापक वर्ग,व रिद्धेश खानविलकर यांचे नियोजन त्यामुळे संस्था अधिक प्रगती पथावर भविष्यात जावो अशी इच्छा व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आयपीएस अधिकारी श्री.शिवम सीमा राजेंद्र वारे यांचा भंडारी मंडळाकडून यथोचित सत्कार!!

डोंबिवली( गुरुनाथ तिरपणकर): प्रतिकुल परिस्थिती, कुटुंबियांचे सहकार्य व मार्गदर्शन, चिकाटी व अभ्यासू वृत्ती मेहनत करून शिवम वखर...