दापोली( प्रतिनिधी) :माटवण पंचक्रोशीतील ग्रामस्थ बंधू-भगिनींच्या उपस्थितीत नवानगर ग्रामस्थ मंडळ आयोजित झोलाईदेवी उत्सव माटवण येथील झोलाईदेवी पटांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी महिलांसाठी आयोजित हळदीकुंकू समारंभाने झाली.पंचक्रोशीतील महिला या समारंभात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सन्मान सोहळा संपन्न झाला.या प्रसंगी श्री. किशोरभाई देसाई (जि.प.सदस्य) श्री.राजेंद्र फणसे (पंचायत समिती सदस्य) श्री.उन्मेश राजे (तालुका प्रमुख, सभापती) श्री.निलेश शेठ (पंचायत समिती सदस्य) सौ. मिनाक्षी विनय शेडगे (जि.प. सदस्या) सौ.सुचिता विनोद महाडीक (पंचायत समिती सदस्या) तसेच कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे सिनेट सदस्य श्री. सुनिलजी दळवी,दापोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री महेश तोरसकर साहेब,माजी सैनिक आणि समाजसेवक श्री.प्रकाश चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते संजय महाडीक,तंटामुक्ती अध्यक्ष विजय महाडीक,रणजित जाधव,
भाऊ नारायण महाडीक आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
यावेळी स्थानिक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमानंतर रात्री पंचक्रोशोतील बालकलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.त्यानंतर जयंत पवार लिखित आणि रोशन मोरे दिग्दर्शित “विठाबाईचा कावळा” हे धमाल सामाजिक विनोदी नाटक सादर करण्यात आले. नाटकाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे आयोजन नवानगर ग्रामस्थ मंडळ तसेच नवानगर ग्रामस्थ सेवा मंडळ,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.जागृती महिला मंडळ आणि युवा प्रतिष्ठान नवानगर यांनीही मोलाचे सहकार्य केले.मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहिल्यामुळे उत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या संपूर्ण उत्सवाच्या आयोजनात ग्रामस्थ मंडळाचे सचिव दिपक महाडीक यांनी सिंहाचा वाटा उचलला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम महाडीक यांनी तर सूत्रसंचालन मुंबई मंडळाचे सचिव प्रसाद महाडीक यांनी केलं आणि शाम महाडीक यांनी सर्वांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा