गुरुवार, ५ मार्च, २०२६
रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई यांच्या विभाग कुर्लावतीने संत रोहिदास जयंती उत्साहात संपन्न
मुंबई : रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई यांच्या विभाग कुर्ला वतीने नेहरू नगर,कुर्ला पूर्व मुंबई येथील नेहरू नगर नागरिक मंडळाच्या सभागृहात संत शिरोमणी संत रोहिदास जयंती सोहळा आणि महिला हळदीकुंकू समारंभ सोहळा नुकताच मान्यवरांच्या आणि समाज बंधुभगिनी यांच्या उपस्थिती मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई यांचे संघअध्यक्ष मयुर शिवराम देवळेकर,संघचिटणीस संतोष तुकाराम गोठणकर व स्थानिक कार्यसम्राट आम.मंगेश कुडाळकर यांचे चिरंजीव यश मंगेश कुडाळकर,विभाग महिला संघटन समिती अध्यक्षा सौ मनाली मनोज वाडकर,संघअध्यक्ष यांच्या पत्नी सौ मनिषा मयुर देवळेकर,विभाग चिटणीस दिलीप रामजी आंबेकर आणि विभागाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे संयोजक व समारंभाचे अध्यक्ष संजय गंगाराम साळगांवकर इत्यादी मान्यवर व्यासपिठावर उपस्थिती होते. संत शिरोमणी संत रोहिदास यांच्या प्रतिमेला मान्यवर पाहुण्यांकडून पुष्पहार घालून पूजन करण्यात आले आणि दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कवी,गीतकार व साहित्यिक शब्दश्री विलास देवळेकर यानी मालवणी पद्धतीने सुंदर गाऱ्हाणा घातला. संत रोहिदास गीत,दोहे व कथा युट्युबच्या माध्यमातून सादर करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सुरवातीलाच समाजातील देवाज्ञा झालेल्या ज्ञात आणि अज्ञात असलेल्याना विभाग वतीने दोन मिनिटे स्तब राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. विभाग व समारंभ अध्यक्ष यानी व्यासपिठावरील म्हणजेच रोहिदास मंचावरील सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संघाचे अध्यक्ष मयुर शिवराम देवळेकर यानी विभागाचे अध्यक्ष संजय गंगाराम साळगांवकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. आम.मंगेश कुडाळकर,भाजपा नगरसेवक रोहिदास मधुकर लोखंडे आणि दैनिक मुंबई मिञ यांच्या संपादिका अनघा राणे यांच्याकडून कार्यक्रमाला शुभेच्छा आल्या आहेत तसेच शुभ संदेश विभागाला मिळाले आहेत याची माहिती देण्यात आली. विभागावतीने देणगीदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नेहरू नगर उत्तर स्था पं. मधून सौ भारती चंद्रशेखर साळगांवकर,सौ माधवी संजय साळगांवकर,सौ सुप्रिया प्रमोद खोपकर,सौ जयश्री हरी पारकर,सौ राजश्री तुळशीराम चव्हाण,डाँ श्री सुभाष रामचंद्र सोनंदकर,श्री प्रमोद श्याम खोपकर,श्री सुनील गंगाराम साळगांवकर,श्री पांडुरंग शंकर हातीपकर आणि नेहरू नगर दक्षिण स्था पं मधून सौ मनिषा मयुर देवळेकर आणि प्रतिक्षा नगर स्था पं मधून श्री मोतीराम मानकू चिखलकर आणि टिळकनगर स्था पं मधून श्री काशिनाथ महादेव आंबेकर आणि चेंबुर स्था पं मधून श्री छगन शिवराम खेडेकर आणि ठक्कर बाप्पा स्था पं मधून श्रीमती अश्विनी अनिल देवळेकर इत्यादी सर्व देणगीदारांच्या देणगी मधूनच संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यात आला. सर्व देणगीदारांचा विशेष सत्कार करण्यात यावा अशी अभिनव संकल्पना सौ माधवी संजय साळगांवकरानी विभागाकडे मांडली होती आणि विभाग अध्यक्ष यानी ती प्रत्यक्षात अंमलात आणली होता आणि प्रतिसादही अपेक्षा पेक्षा चांगला मिळाला. पंचायत व विभाग पदधिकारी,वरिष्ठ पञकार,कवी व साहित्यिक श्री शशिकांत राजाराम सावंत, लोकप्रिय कवी साहित्यिक शब्दश्री विलास हरिश्चंद्र देवळेकर,निवृत्त तहसीलदार श्री तुकाराम भिकाजी इनरकर,श्री संजय देवळेकर,विभाग महिला चिटणीस सौ ज्योती दिपक पाटणकर,समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते संजय चव्हाण इत्यादींचा सत्कार करण्यात आला. वरिष्ठ पञकार,साहित्यिक,कवी व सावली फाऊंडेशन संस्थेचे मार्गदर्शक तसेच मुंबई वृत्तपत्र लेखक संघ यांचे सल्लागार श्री शशिकांत राजाराम सावंत यानी आपल्या भाषणात विभाग कार्याचा गौरव केला आणि विभाग अध्यक्ष श्री संजय गंगाराम साळगांवकर यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून आपण त्यांना आणि विशेष म्हणजे त्यांच्या वडिलाना देखील चांगले ओळखत आहे. त्यांनी त्यांचे वडिल ज्येष्ठ समाजसेवक स्व. गंगाराम गोविंद साळगांवकर यांच्याकडून समाजसेवेचा वारसा पुढे निरंतर चालू ठेवला आहे हे पाहून मला अभिमान वाटतो असे म्हणत त्यांचे वडिल आपले मिञ असल्याचे आवर्जून सांगून आज मुंबईत कुर्ला पूर्व नेहरु नगर येथील मुंबई महानगरपालिकेच्या एका प्रशस्त बाल उद्यानाला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे आणि तो उद्घाटन समारंभ सोहळा आम मंगेश कुडाळकर यांच्या शुभ हस्ते दहा वर्षापूर्वी संपन्न झाला होता याची आठवण करुन देत आम मंगेश कुडाळकरांची ही तिसरी टर्म असून त्यांच्या कार्या बददल प्रचंड गौरव उदगार काढले. पाहुणे संघ अध्यक्ष यानी संत रोहिदास भवनाला समाजबांधवाने देणगी द्यावी असे आवाहन केले आणि कार्यक्रमाला जे जे जाणीवपूर्वक आले नाहीत त्यांचा विचार न करता जे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ते आपले असे म्हणत संत रोहिदास भवनाची अद्ययावत माहिती समाजाला दिली. तर रोहिदासमंचावरील दुसरे पाहुणे संघचिटणीस यानी संत रोहिदास यांचा नविन फोटो समाजाचा व्हाटस्प ग्रुपमध्ये आहे तो विभाग व पंचायतीने पूजनासाठी ठेवावा असे सुचविले. निवृत्त तहसीलदार श्री तुकाराम इनरकरानी संघाच्या कार्यालयासाठी दोन कपाटे देण्याचे जाहीर केले. व्यासपिठ नियोजन विभाग उप चिटणीस दिपक बाबू जाधव,सौ जयश्री दिलीप आंबेकर,श्री मनोज मारुती वाडकर,श्री चंद्रशेखर गंगाराम साळगांवकर आणि फोटो शुटिंगसाठी कु अतिश दिलीप आंबेकर यांचा हातभार लागला तर समारंभ अध्यक्ष यानी अध्यक्षीय भाषणात मुंबई परळ मधील समाजाच्या मालकीचे असलेले आणि महाराष्ट्र शासनाच्या विशेष सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या भव्य संत रोहिदास भवनाला सर्वांनी देणगी द्यावी असे सांगून होळीच्या शुभेच्छा दिल्या. विभाग वतीने नेहरु नगर नागरिक मंडळ आणि समाजाच्या बातम्या सविस्तर पणे प्रकाशित करणारे दै मुंबई मिञ आणि दै मुंबई संध्या यांचे मनापासून आभार व्यक्त करत विभाग चिटणीस यानी सर्वाचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई यांच्या विभाग कुर्लावतीने संत रोहिदास जयंती उत्साहात संपन्न
मुंबई : रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई यांच्या विभाग कुर्ला वतीने नेहरू नगर,कुर्ला पूर्व मुंबई येथील नेहरू नगर नागरिक मंडळाच्या स...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा