आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १० मार्च, २०२६

राजापूर तालुक्यातील कारवली येथे १९ मार्च रोजी भव्य ग्रुप व सोलो डान्स स्पर्धा

पाचल:-(प्रमोद तरळ) राजापूर तालुक्यातील मौजे कारवली विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गुरुवार दि १९ मार्च २०२६ रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे  या निमित्ताने दि. १९ रोजी रा. ८ वा. श्री आई काळंबादेवी एकरुप मित्र मंडळ कारवली यांचे भजन होणार आहे तसेच रात्री ठिक १० वाजता भव्य ग्रुप डान्स व सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 
      ग्रुप डान्स स्पर्धेसाठी पारितोषिक प्रथम क्रमांक ४००१/- व चषक, द्वितीय क्रमांक ३००१/- व चषक, तृतीय क्रमांक २००१/- व चषक तसेच सोलो डान्ससाठी प्रथम पारितोषिक ३००१/- व चषक द्वितीय क्रमांक २००१/-व चषक तृतीय १००१/- व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. सदर स्पर्धा विठ्ठल रुखुमाई मंदिर कारवली (विठ्ठलवाडी) येथे होणार असून 
स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी १७/०३/२०२६ या तारखेपर्यंत आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धा दि. १९ मार्च रोजी रात्री ठीक १० वाजता चालू करण्यात येईल. डान्स ग्रुपनी स्पर्धा सुरू होण्याआधी एक तास अगोदर स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहणे गरजेचे आहे. तसेच स्पर्धकांनी स्वतःला लागणारे मेकअपचे सामान व वेशभूषा स्वतः घेऊन येणे. डान्स साठी असणारे गाणे कमीत कमी ५ मि. ते ८ मि. असे असावे.परीक्षकांनी दिलेला निकाल अंतिम राहील असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे 
     या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महेंद्र वरेकर 9420908223, सुशांत विश्वासराव 8379888993,अतुल भारमल 8928116847
विराज ताम्हणकर 9423163454 यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन कारवली विठ्ठलवाडी ग्रामस्थ मंडळाने केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अ. भा.मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन 18,19 एप्रिल रोजी उदगीर येथे होणार !!

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभणार तर  बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष..  मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार पर...