मुंबई: (प्रतिनिधी )धडक कामगार युनियनचे संस्थापक-महासचिव आणि ‘दैनिक मुंबई मित्र’चे संपादक मा. अभिजीत राणे यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपा कामगार आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल कामगार वर्गात आनंदाचे वातावरण असून, विविध संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई शहराचे उपाध्यक्ष केरबा डावरे ,कार्याध्यक्ष दत्तात्रय मुळीक ठाणे जिल्हाध्यक्ष भरत सकपाळ , मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरेश भोईर व इतर पदाधिकाऱ्यांसह अभिजीत राणे यांची गोरेगाव कार्यालयात भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कामगारांच्या प्रश्नांना आता नवा न्याय मिळणार असून अभिजीत राणे यांनी गेली अनेक वर्षे धडक कामगार युनियनच्या माध्यमातून हजारो कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला आहे. आता सत्ताधारी पक्षाच्या कामगार आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे आल्याने, राज्यभरातील असंघटित आणि संघटित कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी मोठी मदत होईल, असा विश्वास प्रभाकर कांबळे यांनी यावेळी व्यक्त केला.
सत्कार सोहळ्याला राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्यासह संघटनेचे अन्य प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी राणे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अभिजीत दादा राणे यांची ही नियुक्ती कामगार चळवळीला बळ देणारी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचे प्रश्न शासनदरबारी अधिक प्रभावीपणे मांडले जातील."असेही प्रभाकर कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा