मुंबई (पी.डी.पाटील ): मुलुंड येथील
मराठमोळं मुलुंड संस्थेमार्फत जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईच्या माजी महापौर व नामवंत ऍडव्होकेट श्रीमती निर्मला ताई सामंत प्रभावळकर यांचे - आजची स्त्री व तिची बदलती आव्हाने या विषयावर व्याख्यान तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक माहिती दिली जाणार आहे. यावेळी सर्व वयोगटातील महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळ देखील आयोजित केले जाणार आहेत. या कार्यक्रम शनिवार, १४ मार्च रोजी सायंकाळी ५.०० ते ८.०० दरम्यान शारदा निलयम, वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालय, नीलम नगर, फेज २, अग्निशमन केंद्राजवळ, मुलुंड (पूर्व), मुंबई याठिकाणी होणार असून सर्वाकरीता खुला आहे. तरी सर्व स्त्री-पुरुषांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा