एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना कोणीही अन्याय सहन करायचा नाही तर अन्याय विरोधात आवाज उठवला पाहिजेत --- अँड . प्रांजल जाधव
मुंबई (प्रतिनिधी.) महिला व बालविकास विभागांतर असणाऱ्या विक्रोळी भांडुप एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न झाला असून पोस्को कायद्या अंतर्गत अँड. प्रांजल जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,..आपण सर्वजण एकविसाव्या शतकाकडे /आधुनिकतेकडे वाटचाल करत असून कोणीही आजच्या काळात अन्याय सहन करायचा नाही तर सर्वांनी एकत्र येऊन अन्याय विरोधात आवाज उठवला पाहिजेत तरच आपल्याला न्याय भेटत असतो असे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विक्रोळी भांडुप नागरी प्रकल्पाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम.योगिता जोशी होत्या.
महिला व बाल विकास मंत्रालय अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातील असणाऱ्या विक्रोळी भांडुप नागरी प्रकल्पाच्या कन्नमवार नगर व टागोर नगर विभागाच्या मुख्य सेविका श्रीम. नंदिता काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी केंद्रातील गुलाबी ड्रेस कोड मध्ये असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना टागोर नगर ग्रुप नंबर आठ येथील तक्षशील बुद्ध विहारात अँड .प्रांजल जाधव यांनी पोस्को कायद्यासंबंधी व गुड टच व बॅड टच संदर्भात मार्गदर्शन करताना जीवनात येणाऱ्या अडीअडचणी वर मात कशी करायची ,अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी त्वरित पोलिसांची मदत घेतली पाहिजेत. असेही सांगितले. त्याचबरोबर माता रमाबाई आंबेडकर यांना जीवन जगत असताना किती त्रास सहन करावा लागला यासंबंधीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे अँड.. प्रांजल जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम.योगिता जोशी यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन व माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर मुख्य सेविका श्रीम. नंदिता काळभोर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल्यानंतर प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले. असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले शेवटी सर्वांचे आभार मानल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका व मदतनीस बहुसंख्येने उपस्थित राहून पोस्को कायद्यासंबंधी प्रशिक्षण घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा