आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १९ जानेवारी, २०२६

माघी गणेशोत्सवानिमित्त स्वप्नपूर्ती गणपती बाप्पा मंदिरामध्ये कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी:  वाडा तालुक्यातील ' स्वप्नांची पूर्तता करणारा बाप्पा ' अशी ख्याती असणाऱ्या शरद नगर येथील स्वप्नपुर्ती गणपती बाप्पा मंदिरामध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त गुरुवार दि. 22 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षा रूपाली भानुशाली यांनी दिली.
    दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या मंदिरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. वाडा तालुक्यामध्ये हे प्रसिद्ध मंदिर असल्याने माघी गणेशोत्सवामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मंदिरामध्ये भाविक सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत महाअभिषेक करणार आहेत तर सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत मंदिरामध्ये होमहवनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सुमधुर भजनी मंडळ , वाडा यांचा दुपारी २ ते ४ वाजेदरम्यान भजनाचा कार्यक्रम होणार आहे . संध्याकाळी ठीक ३ ते ५ वाजेदरम्यांन जय जिजाऊ महिला मंडळाने हळदी- कुंकू समारंभ आयोजित केला आहे. संध्याकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत खेळ पैठणीचा हा महिलांचा कार्यक्रम होणार आहे.तर रात्री ८ ते १० वाजे दरम्यान महाप्रसाद होणार आहे. दिवसभराच्या कार्यक्रमामधे ठाणे व पालघर जिल्ह्यातील हजारो भाविक सहभागी होतील असे महिला मंडळाच्या सरचिटणीस भावना मोकाशी यांनी सांगितले. तर माघी गणेशोत्सवाच्या दिवशी अनेक भाविक मंदिरामध्ये नवस फेडायला येतात, अशी माहिती मंदिर ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त शरद पाटील यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मुरबाड तालुक्यात आगरी सेनेचा विद्यार्थी गुणगौरव व आगरी समाजरत्न पुरस्कार सोहळा २०२६ मोठ्या उत्साहात संपन्न

मुरबाड : आगरी सेना मुरबाड तालुका व समस्त आगरी समाज मुरबाड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने "विद्यार्थी गुणगौरव व आगरी समाजरत्न पुरस्कार...