मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संकल्प सहनिवास फेडरेल सोसायटी अंतर्गत संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास महिला मंडळ च्या वतीने १६ वा.संकल्प माघी गणेशोत्सव २०२६, मोठया उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला.
पहाटे पासून अभिषेकास सुरुवात झाली. शोभा यात्रा, अथर्व शीर्ष पाठण, गणेश याग, होम हवन, गणेश जन्म , भजन, आदी चे सुंदर आयोजन करण्यात आले होते.दुपारी गणेश जन्म सोहळा करण्यात आला, त्यात महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या, सत्यनारायण पूजे नंतर ढोल-ताश्याच्या गजरात लेझीम च्या तालावर पालखी विभागात काढण्यात आली.
पालखी सोहळ्यात ज्योती माने यांच्या पुढाराकाराने, असंख्य महिलांनी छानदार लेझीम नृत्ये सादर करून गणेश भक्तांची मने जिंकली. त्यात वैदेही घाग, विना परब, राधिका मयेकर, काव्या चिखले, अर्चना सूर्यवंशी, माधवी घाडी व आरती जाधव आदीचा प्रामुख्याने सहभाग होता. नृत्य प्रशिक्षण - मयूर सरसुळे यांनी केले होते.
सहनिवास फेडरेलच्या वतीने, संकल्प गणेशाच्या दर्शनास आलेल्या मान्यवरचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
संध्याकाळ पासूनच संकल्प, नागरी निवारा, संतोष नगर, गोकुळधाम परिसरातील असंख्य भाविकासाठी, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
संकल्प सोसायटीचे पदाधिकारी - धनंजय पानबुडे, अरुण साटम, हनुमंत सुळे, सुबोध महाडिक, , अजय पवार, शैलेश शिरवडकर, राहुल गांगुर्डे, रामचंद्र धुरी, ज्योती माने, मनिषा अमरे, ऐश्वर्या साळवी सह सर्व कार्यकारिणी सदश्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन माघी गणेशोत्सव यशस्वी केला.
संस्थेच्या वतीने दि.. २४ जानेवारी २०२६ रोजी, रात्रौ ७ ते १० वा. पर्यंत महिलांचे हळदी कुंकू, व अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा २५ जाने. ते १ फेब्रु. २०२६ या कालावधीत संपन्न होणार असे संस्थेच्या वतीने कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा