आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५

आगरी युथ फोरम आयोजित 21 वा अखिल भारतीय आगरी महोत्सव डोंबिवली अंतर्गत एक दिवसीय आगरी बोली साहित्य संमेलन व आगरी बोली संदर्भ ग्रंथ संपादन याबाबत जाहीर आवाहन

मुंबई ( प्रतिनिधी) आगरी बोली जतन व्हावी, या प्रामाणिक उद्देशाने आगरी बोलीतील साहित्य संपादित करण्याचा, संदर्भ ग्रंथ बनवण्याचा  आगरी युथ फोरमचा  मानस आहे. त्याकरिता आगरी बोली भाषेतील कविता, लघुकथा, लेख, स्वरचित धवला,नाटुकली किंवा प्रहसन दिनांक 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत पाठवण्याचे आवाहन सर्व आगरी बोली भाषेत लिहिणाऱ्या साहित्यिकांना आगरी युथ फोरम मार्फत करण्यात आले आहे.
      यासाठी पुढीलप्रमाणे  नियम आहेत:-
1) आपले साहित्य हे आगरी बोलीतीलच आणि स्वरचित असावे. आपल्या साहित्यातून जास्तीत जास्त आगरी समाज जीवन व आगरी संस्कृती अधोरेखित होईल शक्यतो असे लिखाण असावे. 
2) कविता 20 ओळींपेक्षा जास्त नसावी. तसेच लघुकथा व इतर साहित्य ह्यासाठी 250 शब्दांची शब्द मर्यादा आहे. 3) आपल्या साहित्यातून कोणत्याही जात, धर्म, राजकीय किंवा व्यक्तीचे विडंबन होईल असे साहित्य ग्राह्य धरले जाणार नाही.4) कविता आणि लघुकथा यातील अगदी कठीण शब्दांचे शब्दार्थ लिहून पाठवावे.
5) साहित्यिकांनी आपले स्वतःचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आणि व्हाट्सअप क्रमांक पानाच्या वर उजव्या बाजूला ठळक अक्षरात लिहावे. सोबत पासपोर्ट साईज फोटो पाठवावा. 
6) आपल्या साहित्याची निवड आगरी युथ फोरम व दिग्गज साहित्यिकांच्या निवड समितीकडून होईल. आणि निवड झालेल्या साहित्यिकांचे साहित्य पुस्तकात संपादित केले जाईल. तसेच निवड झालेल्या साहित्यिकांना आगरी बोली साहित्य संमेलनात निमंत्रित करण्यात येईल.
7) कविता, धवला सादरीकरणासाठी 3 मिनिटे व लघुकथेसाठी 5 मिनिटे अवधी दिला जाईल. 
8) साहित्य ईमेल किंवा दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर दोन्हीपैकी एकाच माध्यमांवर पाठवावे. 9) साहित्य पाठवताना आगरी बोली साहित्य संपादनासाठी असा उल्लेख असावा. 
10) सादरीकरणानंतर साहित्यिकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. 11) साहित्य स्वीकारण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2025 आहे. त्यानंतर आलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. 12) 21 वा अखिल भारतीय आगरी महोत्सव डोंबिवली चा कालावधी 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर असेल आणि याच तारखे दरम्यान एका दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत आगरी बोली साहित्य संमेलन असेल. या संमेलनाला महारष्ट्रातील नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. लवकरच आपल्याला संमेलनाची तारीख कळवण्यात येईल. 13) वर नमूद केलेल्या साहित्य प्रकारांपैकी प्रत्येक साहित्यिकाकडून कोणतेही एक साहित्य स्वीकारले जाईल. साहित्य पाठवण्यासाठी ई-मेल आयडी agriyouthforam@gmail.com
 साहित्य पाठवण्यासाठी व्हाट्सअप क्रमांक 
8779540080/ 9730501029

आगरी युथ फोरम कार्यकारिणी
श्री. गुलाब वझे :- अध्यक्ष,श्री. शरद पाटील :- उपाध्यक्ष,श्री. पांडुरंग म्हात्रे :- खजिनदार,
श्री.रामकृष्ण पाटील :- सरचिटणीस,श्री. जालिंदर पाटील :- कार्याध्यक्ष, श्री.गुरुनाथ म्हात्रे :- सचिव

समन्वय समिती
श्री प्रा. एल. बी. पाटील : उरण रायगड ,श्री. पुंडलिक म्हात्रे :- पनवेल रायगड, श्री. संदेश भोईर :- मुंबई बोरिवली 8779540080, श्री. श्याम माळी :- बदलापूर, मुरबाड , श्री. प्रकाश पाटील :- पालघर , श्री. रामनाथ म्हात्रे :-नवी मुंबई ,श्री. गजानन पाटील :- भिवंडी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...