मुंबई(सतिश वि.पाटील ):गौरी गणपतीचे भक्तिमय वातावरणात मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात संपन्न झाला.सर्व लहान थोर उपस्थित होते.गेले अनेक वर्षांपासून पारंपारिक गणेश उत्सव एकत्र साजरा होतो.अनेक मान्यवर नातेवाईक , महीलांची मानाचा ओवसा घेऊन दर्शनास गर्दी होत असते.
यंदा कु.ध्रुव दीपक पाटील यांने आपल्या कलेने गणपती देखावा बनवला होता.त्याचे सर्वत्र कौतुक करीत होते.विसर्जन करताना अनेकांनी मोबाईल मध्ये फोटो जतन केले.पुढील वर्षी आणखीन प्रगती करण्याची इच्छा व्यक्त केली.
"गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया " पुढच्या वर्षी लवकर या ! असा जय घोष करत लाडक्या गौरी गणपतीचे विसर्जन घाटावर भांडूप कुंडेश्वर येथे करण्यात आले.लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जनसमुदाय जमला होता.विसर्जन ठिकाणी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस व प्रशासन, सेवक तैनात केले होते.वाहनासाठी विसर्जन तलावापासून लांब पार्किंग व जागोजागी निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते.सर्व भक्तांचे समीती कडून सहर्ष स्वागत करण्यात येत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा