आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळाच्या सचिवपदी ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांची एकमताने निवड

मुंबई (प्रतिनिधी): विक्रोळी कन्नमवार नगर येथील ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळ (रजि.) या संस्थेची सन २०२५ ते २०२८ करीता त्रैवार्षिक निवडणुकीत विजयी उमेदवारांची पदनिहाय निवडणुकीत अध्यक्षपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत श्री. विवेक गायकवाड यांना ६ मते मिळाली. श्री. निवृत्ती मस्के यांना ४ मते मिळाली तर श्री. सुरेश सरनोबत यांना फक्त १ मत मिळाले.
      निवडणूक अधिकारी श्री. दिपक देशनेहरे आणि विनोद वणीकर यांनी पुढीलप्रमाणे नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर केली. अध्यक्ष श्री. विवेक विठोबा गायकवाड, उपाध्यक्ष श्री.निवृत्ती शिदू मस्के,सचिव ज्येष्ठ पत्रकार श्री नासिकेत कृष्णकांत पानसरे, उपसचिव श्री.श्रद्धानंद रावबा निकम ,खजिनदार  श्री .गौतम निवृत्ती डांगळे,कार्यकारिणी सदस्य
श्री .सुरेश भिकाजी सरनोबत, भुमय्या रामलू सोमा, राजाराम शंकर क्षीरसागर, बबन बापू माने, दत्तात्रय रामचंद्र धनवडे, सुनिल नारायण गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, भांडुप स्टेशन परिसर होणार मोकळा, बेस्ट चौकीच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन संपन्न

मुंबई (प्रतिनिधी): भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय व वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ...