मा. निलेश आहिरे (तालुका अध्यक्ष, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस) यांना
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!
समाजसेवा ही केवळ एक जबाबदारी नसून ती एक जीवनधर्म असतो. या जीवनधर्माचे जतन आणि पालन करणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व म्हणजे मा. निलेश आहिरे. आपल्या निःस्वार्थ कार्यातून,सकारात्मक विचारांतून आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत राहून कोपरी विभागात स्वतःची एक विश्वासार्ह व प्रेरणादायी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात वॉर्ड सरचिटणीस म्हणून झाली. पुढे वॉर्ड अध्यक्ष, आणि त्यानंतर उत्कृष्ट कार्यगतीच्या जोरावर त्यांना थेट तालुका अध्यक्ष पदापर्यंत पोहोचत त्यांनी कार्यक्षमतेची ठसठशीत छाप सोडली आहे. ही मजल त्यांनी मेहनत, संयम, आणि जनतेशी असलेल्या घट्ट नात्याच्या बळावर गाठली आहे. त्यांचा शांत, मनमिळाऊ आणि सर्वसमावेशक स्वभाव, राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन सर्वांशी जपलेले मैत्रीपूर्ण संबंध, यामुळे ते आज कोपरी विभागातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये मानाचे स्थान मिळवून आहेत.
गरजू, वंचित आणि शोषित घटकांसाठी सातत्याने काम करत राहणे, ही त्यांची कार्यशैली आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्रतपासणी व चष्मेवाटप, महिलांसाठी आरोग्य जनजागृती मोहिमा, रक्तदान शिबिरांचे आयोजन, वृक्षारोपण मोहिमा, प्लास्टिकविरोधी जनजागृती, स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
त्यांच्या सामाजिक योगदानाची नामवंत संस्थांकडून दखल घेत भारतीय माहिती अधिकार (All India RTI न्यूज नेटवर्क), आधार इंडिया, प्रेरणा फाउंडेशन, जीवन आधार फाउंडेशन, आदर्श मुंबई पाक्षिक, अजिंक्य युवा प्रतिष्ठान, समीक्षा पब्लिकेशन, अखिल भारतीय समाज, गाडी लोहार समाज उन्नती मंडळ, हरिश्चंद्र फाउंडेशन यांसारख्या अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संस्थांकडून “समाजरत्न”, “युवा नेतृत्व”, अशा विविध सन्मानांनी गौरविण्यात आले.
कोरोना काळात, समाजासाठी न थांबता काम करणाऱ्या निलेश आहिरे यांनी विभागात दोन वेळा मोफत अन्न वितरण, घरोघरी किराणा वाटप, तसेच मोफत बेड, ऑक्सिजन सिलेंडर मिळवून देणे, अत्यावश्यक औषधांची उपलब्धता करून देणे अशी समाजोपयोगी कामे करून समाजाला आधार दिला. यामुळेच त्यांना "कोरोना योद्धा" म्हणूनही गौरविण्यात आले.
आपल्या कार्यातून समाजात नवा विश्वास निर्माण करणाऱ्या मा. निलेश आहिरे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! आपले कार्य नेहमी समाजासाठी दीपस्तंभ ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा