आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

जी.के.एस.महाविद्यालय खडवलीच्या विद्यार्थिनीनी हॅण्ड कबड्डी स्पर्धेत पटकवला द्वितीय क्रमांक

मुंबई (शांताराम गुडेकर)  मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जी. के. एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडवली च्या विद्यार्थीनींनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी ठाणे जिल्हा हॅण्ड कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित हॅण्ड कबड्डी स्वतंत्र चषक २०२५ -२०२६ या स्पर्धेत सहभाग घेतला.सदर स्पर्धा चॅम्पियन्स स्पोर्ट्स पार्क,पोगाव, भिवंडी, ठाणे येथे भरविण्यात आल्या होत्या.सदर स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट सामने खेळले. जी. के. एस महाविद्यालय च्या विद्यार्थीनी कु.सुप्रिया जाधव, जान्हवी दामले ,कामिनी बोंबे,दिव्या भंडारी ,जिज्ञासा पाटील , अदिती चिलवंते या विद्यार्थिनींनी हॅण्ड कबड्डी स्पर्धेत खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत द्वितीय क्रमांक पटकावला. सर्व विद्यार्थीनींचे जी.के.एस. महाविद्यालयच्या संचालिका सौ.कविता शिकतोडे तसेच मुख्याध्यापक डॉ.बी.एल. जाधव सर तसेच उपप्राचार्य प्रा. प्रशांत तांदळे सर महाविद्यालयाच्या क्रिडा शिक्षिका सौ. हर्षला विक्रम विशे मॅडम व श्री.बाळाराम पांडुरंग चौधरी सर यांनी कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

काव्यांगण... शिक्षक दिन विशेष

आवडते मला माझी शाळा सकाळी भरतो गोपाळाचां मेळा शाळेत माझ्या भरपूर खेळ मुलाचां बसला त्याच्याशी मेळ आनंदाने येतात सगळी मंडळी डब्यात खाऊ भाजी पो...