आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवघर येथे स्वातंत्र्य दिवस साजरा

उरण दि १६(विठ्ठल ममताबादे )
भारत देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिवस रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवघर येथे साजरा करण्यात आला.ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर प्राथमिक शाळा नवघर मधील विद्यार्थ्यांची बाल सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे अध्यक्ष स्थान प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे यांनी भूषविले. बालसभा संपल्यानंतर रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवघर नवीन इमारत बांधकाम चालू आहे त्या इमारतीमधील दोन वर्ग जीडीएल कंपनीच्या सीएसआर फंडातून पूर्ण झाले त्या वर्गाचे उद्घाटन तात्पुरत्या साध्या स्वरूपात करून शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी गैरसोय होत असल्यामुळे आणि शिक्षकांना शिकविताना अडचण येत असल्यामुळे त्यांना हे दोन वर्ग वापरासाठी देण्यात आल्या या दोन वर्गाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून उरण पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेवजी बंडा, गटशिक्षण अधिकारी घरत मॅडम, सरपंच सविता मढवी,उपसरपंच संध्या पाटील, ग्रामपंचायत सदस्य विश्वास तांडेल, दिनेश बंडा, कुंदन कडू, रत्नाकर चौगुले, प्रियदर्शनी म्हात्रे, कविता पाटील, सेवानिवृत्त शिक्षक भारत पाटील, राजा पाटील, सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र घरत, कुंडेगाव शाखाप्रमुख नंदकुमार चौगुले, शिवसेना शाखाप्रमुख नवघर अविनाश म्हात्रे, रवीशेठ पाटील, नितीन मढवी,महावीर पाटील, विजय भोईर, विजय तांडेल, उपशाखाप्रमुख विशाल डाके व शशिकांत तांडेल, संतोष शेठ पाटील, संतोष घरत,रघुनाथ तांडेल, योगेश म्हात्रे, समाधान तांडेल, प्राथमिक शाळा नवघर मुख्याध्यापिका उषा गावंड, अनिल म्हात्रे, प्रकाश जोशी, प्रसाद म्हात्रे, गणेश गावंड, श्रीम. सरिता गोरे हे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी नवघर गावातील कु. रीत अविनाश म्हात्रे हिचा १५ वा वाढदिवसानिमित्त शाळेतील वर्गांना भिंतीवरचे घड्याळ तसेच शिक्षकांना शालेय वस्तू भेट म्हणून देण्यात आले हा कार्यक्रम ग्रामपंचायत नवघर आणि शाला व्यवस्थापन समिती यांच्यातर्फे करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

काव्यांगण... शिक्षक दिन विशेष

आवडते मला माझी शाळा सकाळी भरतो गोपाळाचां मेळा शाळेत माझ्या भरपूर खेळ मुलाचां बसला त्याच्याशी मेळ आनंदाने येतात सगळी मंडळी डब्यात खाऊ भाजी पो...