आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

६ जानेवारी २०२५ रोजी नागपूर येथे राष्ट्रीय अधिवेशन !! युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे : राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांचे आवाहन

गडब(अवंतिका म्हात्रे)नवीन वर्षाच्या सुरुवातीला ६ जानेवारी २०२५ रोजी नागपूर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचे ठरले असून राज्यभरातील सर्व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी अधिवेशनाला उपस्थित रहावे असे आवाहन युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी केले आहे. अल्पवाधितच फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरात युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची बांधणी करून कमी वेळेत आपल्या कार्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त सदस्य संघटनेला जुळविले व संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरात युवा ग्रामीण पत्रकार संघ कार्यरत आहे. समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर हे ब्रिद वाक्य समोर ठेवून एक वर्षाआधी युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली. एवढ्या कमी वेळेत देशभरातील
पत्रकारांना संघटनेशी जुळवून त्यांच्या अडिअडचणी व समस्या सोडवून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहण्याचे काम युवा ग्रामीण संघ करत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ६ जानेवारी २०२५ रोजी नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाला सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे. असे आवाहन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

युवांसाठी प्रेरणादाई असलेल्या श्रीमती आयएएस त्रुप्ती धोडमिसे 'युथ आयकॉन अवॉर्ड २०२५' ने सन्मानित

मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित कार्यक्रमात कोकण एनजीओ इंडिया तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आय...