आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

गणेश हिरवे प्रेरणा फाऊंडेशन पुरस्काराचे मानकरी

मुंबई (सुभाष मुळे) जोगेश्वरी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि पत्रकार गणेश हिरवे यांना दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी प्रमुख पाहुणे रामजीत गुप्ता, नारकर सर, प्रेरणा गावकर यांच्या शुभहस्ते समाजभूषण पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात आले. हिरवे यांचे काम चांगले असून नेहमीच ते सामजिक कार्यात दंग असतात.आतापर्यंत त्यांना विविध संस्थांनी त्यांच्या कार्याचा सन्मान करीत त्यांना १३० पुरस्कार मिळालेले असून आजही त्यांचे काम सुरळीतपणे सुरूच आहे.तळागाळातील विविध विद्यार्थी, वंचित कुटुंब, रोजंदारीवर काम करणारे, गोर गरीब यांना मदत करण्यासाठी ते कायमच पुढाकार घेताना दिसतात.आतापर्यंत त्यांनी ३६ वेळा रक्तदान आणि १७ वेळा प्लेटलेट्स डोनेट केले असून मृत्यूपश्चात देहदान अवयवदान देखील ते करणार आहेत.वाचनाची आवड जोपासता यावी म्हणून त्यांनी स्वखर्चाने तेरा हजाराहून अधिक पुस्तकं मोफत वाटलेली आहेत. विद्यार्थीप्रिय आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून अनेकजण त्यांना ओळखत असून गेज्या २५ वर्षांपासून वृत्तपत्र लेखक व पत्रकार म्हणून देखील ते कार्यरत आहेत.कारोना काळात देखील त्यांनी उल्लेखनीय काम करून तब्बल पाच वेळा रक्तदान केलं होत. अनेक नागरी समस्या देखील पुढाकार घेऊन ते सोडविण्यात अग्रेसर असतात.पुरस्कार मिळाल्याने अनेकांनी हिरवे गुरुजींचे अभिनंदन केलं असून त्यांना पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.अशा व्यक्तींचा समाजाला अभिमान असल्याचे प्रेरणा संस्थेचे सचिव वैभव कुलकर्णी यांनी सांगितले.येत्या १९ जानेवारी २०२५ रोजी त्यांना नवक्षितिज ट्रस्ट च्या महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: