दापोली- दापोली तालुक्यातील नॅशनल हायस्कूल मांदिवली येथे आयोजित केलेल्या दापोली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन व स्वागतपर समारंभात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत दापोली तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगरचा समारंभपूर्वक गौरव करण्यात आला. दापोली पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी दिलीप मर्चंडे, गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र सांगडे, मांदिवली गावच्या सरपंच तुळसा जाधव, नॅशनल हायस्कूल मांदिवली संस्थेचे अध्यक्ष उस्मान खोतू मालवणकर, उपाध्यक्ष अजिज सावंत, सचिव अब्दुल खांचे, स्कूल कमिटी चेअरमन नूर मुकादम आदी मान्यवर उपस्थित होते. चंद्रनगर शाळेसाठी दापोली शिक्षण प्रभागाचे विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले, केंद्रप्रमुख प्रवीण काटकर, चंद्रनगर शाळेतील शिक्षक बाबू घाडीगांवकर, विद्यार्थी सांची मिसाळ, श्रेयश शिगवण यांनी हा सन्मान स्वीकारला. दापोली तालुकास्तरावरील विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल चंद्रनगर शाळेचा सन्मान केल्याबद्दल चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण, चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, चंद्रनगर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्रीधर जाधव, उपाध्यक्ष सुनील रांगले, चंद्रनगर शाळेतील शिक्षिका मानसी सावंत, रेखा ढमके, शिक्षण कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सदानंद मिसाळ, जिल्हा नियोजन समिती सदस्य मोहन मुळे आदी अनेकांनी आभार व्यक्त केले आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
महिला वादक, गायिकांच्या सादरीकरणाने संगीतप्रेमी तृप्त
नवी मुंबई : लता मंगेशकर, आशा भोसले या नामांकित गायिकांनी अजरामर केलेली एकाहुन एक सुंदर, श्रवणीय गाणी "रहे ना रहे हम" ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा