आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

कर्मचाऱ्यांनासाठी निवडणूक विशेष ट्रेन्स चालवाव्यात सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांची मागणी

मुंबई: येत्या बुधवारी २० नोव्हेंबर रोजी असणाऱ्या मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या स्टाफ साठी मध्य रेल्वे च्या वतीने पहाटे लवकर आणि रात्री उशीरा लोकल ट्रेन सोडण्यात येणार आहेत.यामुळे कामगारांना थोडासा दिलासा मिळेल.मतदानाच्या दिवशी पहाटे पाच वाजता कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असते तसेच मतदान संपले की मतपेट्या आणि इतर निवडणूक साहित्य मुख्य सी पी एस ऑफिस मध्ये जमा करण्यास रात्रीचे दीड दोन वाजतात आणि त्यानंतर कर्मचारी आपापल्या घरी जातात.या दिवशी सकाळी आणि रात्री निवडणूक विशेष एक दोन ट्रेन्स चालविण्यात येणार आहेत.बेस्ट बसेस देखील कर्मचाऱ्याना घेऊन जातील.असे असले तरी बऱ्याच कर्मचाऱ्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणपासून खूप दूर अंतरावर ड्युटी आल्या आहेत.बदलापूर च्या कर्मचाऱ्यांना बोरिवली गोरेगाव तर अंधेरी जोगेश्वरी वाल्यांना कल्याण अंबरनाथ पनवेल येथे जायचे आहे.आपण राहतो त्या ठिकाणच्या किमान आठ दहा किमी च्या परिसरात ड्युटी आली तर अधिक सोयीचे होईल असे कर्मचारी सांगतात आणि निवडणूक दिवशी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा देखील व्यवस्थित असायला हव्यात कारण मतदानाचा प्रत्यक्ष दिवस आणि त्या पूर्वीचा आधीच्या दिवशी मतदान केंद्र तयार करणे आणि इतर आवश्यक मतदारांच्या दृष्टीने सर्व गोष्टी निवडणूक कर्मचारी करीत असून या दोन दिवसात त्यांची खूप दमछाक होते.मध्य रेल्वे जशा विशेष ट्रेन सोडणार आहेत तशाच ट्रेन्स पश्चिम आणि हार्बर आणि इतर ठिकाणी चालविण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे चिपळूण येथे प्रकाशन

मुंबई (शांताराम गुडेकर )   साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे प्रकाशन वृत्तपत्रा...