आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

गुहागर मतदारसंघात चौरंगी लढतवंचितचे शिलेदार सुनील जाधव यांचे पारडे जड

गुहागर  (रामदास धो.गमरे) गुहागर मतदारसंघात एकूण ७ उमेदवार निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले असून आपले नशीब आजमावत आहेत, मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी अनेक आकर्षक योजनांचे आमिष दाखवून आपापल्या परीने मतदारांची मने वळवण्याच काम केलेले आहे, परंतु तशी कोणतीही खोटी बतावणी न करता स्वकर्तृत्वावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी सैनिक सुनील सखाराम जाधव हे देखील विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत, लोकांच्या मनातील आदर्श व्यक्तिमत्व, सर्वांच्या चांगल्या वाईट परिस्थितीत धावून जाणारा हक्काचा माणूस, कोणतीही खोटी आश्वासने, बतवण्या न करणारा व देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर कर्तव्यनिष्ठपणे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेला एक माजी सैनिक या रिंगणात उतरल्याने एक सच्चा देशभक्त विधानसभेत पोहोचू शकतो असे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे आंबेडकरी विचारांना मानणारा, उच्च पदवीधर तरुण, ओबीसी, मुस्लिम समाजातील उच्चशिक्षित तरुण मुंबईत नोकरीच्या ठिकाणी रजा टाकून कोकणात आपल्या गावी मतदारसंघात सुनील जाधव यांच्या प्रचार कामासाठी दाखल झाले आहेत, बहुजन समाजातील एससी, एसटी, एनटी, ओबीसी, मुस्लिम अल्पसंख्याक या समाजातील अनेकांनी फुल न फुलाची पाकळी स्वरूपात आर्थिक मदत करून एक हात मदतीचा पुढे करीत आहेत, सुनील जाधव यांच्या संविधान बचाव, आरक्षण बचाव या रोखठोक विचारांमुळे गावागावात, वाडीवाडीत, चौकाचौकात, कट्यावर, सहानेवर ही सुनील जाधव यांच्याबद्दलच्या चर्चांना उधाण आलेल आहे, तरुणांची एक मोठी फळी सुनील जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असून वंचितचे सुनील जाधव यांच्या अंगठी निशाणीला निवडून देऊन आपण एक परिवर्तन घडवूया असे वारे सध्या गुहागर तालुक्यात वाहू लागले आहेत, आता जनता जुन्या त्याच त्याच नेत्यांना, पक्षांना उमेदवारांना, निवडून आल्यानंतर पाच वर्षे मतदारसंघात न फिरकणाऱ्या नेतेमंडळीना कंटाळली आहे, राज्यात रस्ता, रस्त्यावरील लाईट (स्ट्रीट लाईट), पाणी या मूलभूत गरजांचा वानवा आहे, शिगेला पोहोचलेली महागाई, भाजीपाला, कांदा, बटाटा, लसूण, टोमॅटो, घरगुती गॅस, कडधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, आरक्षण, बेरोजगारी यावर कोणतीही ठोस अशी भूमिका नाही, खोटी आश्वासने, प्रलोभने देणाऱ्या सरकारला बदलून नव्या दमाच्या उमेदवारांना संधी देण्यात यावी अशी मानसिकता मतदारराजाची झाली आहे, लोकांना ही बदल हवाय म्हणून परिवर्तनाचे वारे सर्वत्र वाहत आहेत म्हणूनच निस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या, देशाची सेवा करणाऱ्या माजी सैनिक सुनील जाधव यांना जर संधी दिली तर गुहागर मतदारसंघाचा कायापालट होईल असा सर्वांचा ठाम विश्वास होत चालला आहे म्हणून खऱ्या अर्थाने गुहागर तालुक्यात चौरंगी लढत होणार असून त्यात सुनील जाधवांच पारडं जड दिसत आहे व विरोधकांना घाम फुटला आहे. या चुरशीच्या सामन्यात सर्वच पक्ष सर्व तयारीनिशी उतरले असून सदर चौरंगी लढतीत कोण बाजी मारत हा चर्चेचा विषय झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कातळवाडी गावच्या रहिवाशी सावित्री ह.कारकर यांचं दुःखद निधन ;संजय,अजय,आदित्य बंधुंना मातृशोक, कातळवाडीवर दुःखाचा डोंगर

मुंबई (प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र व गावचे गुरव स्व.हरिश्चंद्र ता.कारकर यांच्या पत्नी सावित...