आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

महायुतीच्या उमेदवार मनीषा वायकर यांची विजयीसाठी घोडदौड........

जोगेश्वरी (पूनम पाटगावे ):- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीत काही खासदार व आमदारांच्या पत्नीही निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. महायुती असो की महाविकास आघाडी या दोन्ही गटातील घटक पक्षांच्या काही नेत्यांनी आपल्या पत्नींना निवडणुकीत उतरवले आहे. असे अनेक नेते आहेत जे स्वत: अनेकवेळा आमदार-खासदार राहिले आहेत आणि यावेळी त्यांनी आपल्या पत्नींवर दावं लावला आहे. यापैकी एक म्हणजे जोगेश्वरी पूर्वमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मनीषा वायकर या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील २०२४ मध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यातील जागेश्वरी पूर्व जागेसाठी शिवसेनेच्या उमेदवार आहेत. मनीषा वायकर यांचे पती रवींद्र वायकर शिंदे हे शिवसेनेचे खासदार आहेत. २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून आमदार असलेले रवींद वायकर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात घराणेशाहीला महत्व दिल्याचे दिसून आले. 
         अशाच जोगेश्वरी पूर्व मतदार संघातून एकमेव महिला उमेदवार म्हणून रिंगणात असलेल्या मनीषा वायकर यांनी विजयासाठी घोडदौड सुरु केली असून संपूर्ण जोगेश्वरीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या कि, "एकमेव महिला उमेदवार म्हणून मला त्याचा अभिमान तर आहेच व जोगेश्वरीला एक महिला आमदार मिळेल ही खूप अभिमानाची गोष्ट असून जोगेश्वरीच्या विकासासाठी नेहमीच कायम तत्पर राहू. तसेच जोगेश्वरीतील महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन शक्य तेवढे सी सी टी व्ही कॅमेरे लावून महिलांवर होणाऱ्या घटनाबाबत जागरूक राहू. महिलासाठी बचतगटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मिती करून त्यांना आर्थिक पाठबळ दिले जाईल. जोगेश्वरी कॅन्सर हॉस्पिटल उभे करू व जोगेश्वरी झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू. जोगेश्वरीच्या उर्वरित विकासासाठी खासदारांच्या मदतीने पूर्ण विकास करू. जोगेश्वरीच्या जनतेवर पूर्ण विश्वास असल्यामुळे भारी लीड घेऊन जिकूंन येऊ व महायुतीचे फटाके फोडू " असे मत मनीषा वायकर यांनी मांडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मोहन जोशी यांना 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' घोषित...

मुंबई (गणेश तळेकर)  मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना घोषि...