आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

'अस्मिता' चे रांगोळी प्रदर्शन

मुंबई( गणेश हिरवे)अस्मिता संस्था, जोगेश्वरी आयोजित रांगोळी प्रदर्शन उद्घाटन सा रे ग म पा लिटिल चॅम्पस ची विजेती कु. गौरी गोसावी हिच्या हस्ते संपन्न अस्मिता संस्था, जोगेश्वरी ( पूर्व ) च्या वतीने रांगोळी स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन दि. १२ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन सुप्रसिद्ध लिटिल चॅम्पस कु. गौरी गोसावी हिच्या हस्ते करण्यात आले.या प्रदर्शनात `मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ` ही मध्यवर्ती कल्पना ठेऊन संत ज्ञानेश्वर, कुसुमाग्रज, अतुल परचुरे, दादा साहेब फाळके, संत तुकाराम, आहील्याबई होळकर याच बरोबर मतदान जागृती अश्या विविध सामाजिक विषयावरच्या रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. 
       या वेळी कु.गौरी गोसावी यांच्या हस्ते रांगोळी विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. प्रेक्षकांच्या विनंतीनुसार गौरी हीने काही गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. 
सदर प्रदर्शन अस्मिता भवन , जोगेश्वरी मेट्रो स्टेशन समोर, मुंबई येथे रविवार दि. १७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत संध्या ५ ते ९ पर्यंत खुले असणार आहे.
      प्रास्ताविक श्री सुधीर गोरे, संस्था परिचय सरचिटणीस श्री राजन चाचड, सूत्रसंचालन मनीषा घोडके आणि सानिका कदम व आभार प्रदर्शन प्रकाश सावंत यांनी केले..
या वेळी जेष्ठ रांगोळी कलाकार श्री महादेव गोपाले, श्री प्रशांत सुवर्णा, श्री संकेत भगत, श्री निलेश निवाते , उपस्थित होते. अस्मिता गेली ४८ वर्षे शिक्षण, कौशल्य विकास, दिव्याग चिकित्सा व पुनर्वसन , आरोग्य , सांस्कृतिक कला अश्या विविध क्षेत्रात मुंबईत कार्यरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे चिपळूण येथे प्रकाशन

मुंबई (शांताराम गुडेकर )   साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे प्रकाशन वृत्तपत्रा...